मुंबई : काल सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करण्यात आली. निवडणुक चिन्हांबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक आयोगाकडे दिल्याने एकनाथ शिंदेंना थोडासा दिलासा मिळाला, तर ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्याने ठाकरेंना धक्का बसला आहे. परंतु अजूनही निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल करत कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही असं म्हटलं आहे. तसेच आज शिवसेनेने भाजपचा पुन्हा एकदा कमळाबाई उल्लेख करत सामनातून टिका केली आहे.
मोठा ट्विस्ट..! उद्धव ठाकरेचं 2023 पर्यंत पक्षाचे अध्यक्ष, कोर्टात कागदपत्र सादर
मुंबईवरील संकटाचा प्रत्येक घाव शिवसेनेने छातीवर झेलला आहे. शिवसेनेचे दांडिया अस्सल मर्दानीच असतो. शिवसेनेच्या शाखा म्हणजे चोवीस तास लोकांसाठी उघडी असलेली जनमंदिरेच आहेत. तितकीच ती न्यायाची मंदिरे आहेत. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची केलेली ही रचना आजही मजबूत पायावर उभी आहे. ती कमळाबाईच्या मराठी दांडियाने इंचभरही हलणार नाही, अशी टिका सामनातून शिवसेनेने भाजपवर केली आहे.
शिवसेना शिल्लक आहे म्हणून मराठी शिल्लक आहे. हिंदुत्व बचावले आहे. शिवसेनेवर पाठीमागून घातकी वार करणाऱ्यांना याच शिवसेनेने स्वाभिमानाने जगायला शिकवले, गर्वाने मराठी पणाची कवचकुंडले दिली. पण आज तेच लोक शिवसेनेवर उलटले आहेत. स्वकीयांशी लढणे हे महाराष्ट्राचे व मराठ्यांचे दुर्भाग्य काय आजचे आहे. असं म्हणत शिंदे गटावर देखील प्रखर शब्दात टिका केली आहे.
“कितीही अफजल खान आले तरी मी घाबरणार नाही”; ठाकरेंचा शहांवर अप्रत्यक्ष निशाणा
तसेच मुंबई महापालिकेवरील भगवा झेंडा खाली खेचण्यासाठी भाजपच्या कमळाबाई अनेक युक्त्या आणि क्लृप्त्या करीत आहे. एका बाजूला मराठी लोकांत फुट पाडायची तर दुसऱ्या बाजूला शाकाहार, मांसाहार असे विषय घेऊन इतर प्रांतीय, समाजाला वेगळे करायचे असे त्यांचे एकंदरीत धोरण असल्याचंही म्हटलं आहे. त्याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
Read also
- “देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार”; एकनाथ शिंदे
- गुजरात मॉडेल अभ्यासासाठी राज्यातील मंत्री गुजरातमध्ये..! राष्ट्रवादीची टिका
- राजकीय लढाई सुरू असताना मुख्यमंत्र्यांचे धडाकेबाज निर्णय; वाचा संपुर्ण यादी
- रात्री 12 पर्यंत मनसोक्त गरबा नाचा; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
- कोर्टात लढाई सुरू असताना काॅंग्रेस, भाजपच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश; ठाकरेंचं बळ वाढलं