नांदेड : देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. शिवसेनेला धक्का देत भाजपनं माजी आमदार सुभाष साबणे यांना आपल्या गोटात घेतलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सुभाष साबणे यांना आज भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यानंतर झालेल्या भाजपच्या मेळाव्यात चंद्रकांत पाटील, खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. तर सुभाष साबणे यांनी आपला विजय निश्चित असल्याचा दावा केलाय.
ठाकरे सरकारच्या ३ सदस्यीय प्रभागरचनेला ग्रहण; मनसे न्यायालयात सोमवारी याचिका दाखल करणार
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसैनिक माझ्यासोबत आहेत, असा दावा सुभाष साबणे यांनी केलाय. तसंच ही पोटनिवडणूक धनसंपदा विरुद्ध सामान्य कार्यकर्ता अशी आहे. त्यात भाजपचा विजय निश्चित आहे, असा विश्वास सुभाष साबणे यांनी व्यक्त केलाय. सुभाष साबणे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. तत्पूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नांदेड दौऱ्यावेळीच सुभाष साबणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
कुठेही गेल्यावर चांगले रस्ते दिसतात, लोकं म्हणतात गडकरी साहेबांची कृपा; पवारांकडून कौतूकाची थाप
विधानसभा गाजवणारा नेता म्हणून सुभाष साबणे यांची ओळख आहे. मला खात्री आहे की पंढरपूरनंतर देगलूरमध्ये क्रांती होणार. तीन पक्षाचे अलिबाबा आणि चाळीस चोर मतदान मागण्यासाठी येणार. त्यांनी पीक विम्याचे चार हजार कोटी रुपये वाटून खाल्ले. अतिवृष्टीनंतर आता आम्हाला हे काय देणार? मला खात्री आहे हे काही देणार नाहीत, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली; काही दिवस आराम करणार असल्याची ट्विटरवर माहिती
अशोक चव्हाण हा भाग्यवान माणूस, पण सरपंचाचा शिपाई झाला. मुख्यमंत्री होते पण लाचार होऊन मंत्रिमंडळात मंत्री झाले, असा टोला सदाभाऊ खोत यांनी चव्हाणांना लगावलाय. सरकारमधील लोक नोटा मोजून थकली. या पोटनिवडणुकीत पैशांचा महापूर येणार आहे. लक्ष्मी आली की दरवाजा उघडा ठेवा. हे शपथ मागतात तेव्हा खोटी शपथ घ्यायची. मशीनने मोजलेले पैसे घ्यायचे, पण मतदान साबणेंना द्यायचं, असं आवाहन खोत यांनी देगलूरमधील मतदारांना केलंय.
Read Also :
- प्रियंका गांधींना भाजप घाबरते, पोलिसांनी त्यांना तात्काळ सोडाव, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर…?
- कार्यकर्त्यांनी पोलिसांची गाडी पेटवली; प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
- शाळेचं नाही तर आपल्या भविष्याचं दार उघडलं; उद्धव ठाकरेंचा विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद
- गुगलवर टरबुज सर्च करा, मग कळेलं गद्दार कोण? एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांची उडवली खिल्ली
- मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर शिवसेना खासदार भावना गवळी ईडी चौकशीला हजर राहणार?