चंद्रपुर : राज्याचे वनमंत्री, सांस्कृतिक मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुधीर मुनगंटीवार चांगलेच सक्रीय झाले आहेत. यातच रात्री 12 वाजता आपला नियोजित कार्यक्रम आटोपून परतत असताना सुधीर मुनगंटीवार यांनी एका रूग्णालयात जाऊन रान डुकराने गंभीर जखमी केलेल्या एका शेतकऱ्याची विचारपुस केली. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना विविध सुचना देखील केल्या.
“तुम्ही BMC साठी 135 चे टार्गेट ठेवलं, मी तुम्हाला 150 नगरसेवककांचे टार्गेट देतो”; अमित शाह
आपल्या शेतात काम करत असताना चुनाळा येथील शेतकरी अजय नत्थू कार्लेकर यांच्यावर अचानकपणे रानडुकराने हल्ला केला. त्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झालेत. त्यानंतर त्यांना जवळच्या राजूरा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. याच दरम्यान गडचांदुरचा कार्यक्रम परतत असताना रात्री 12 नंतर सुधीर मुनगंटीवार यांना राजूरचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी या प्रकरणाची माहिती दिली.
“उद्धव ठाकरेंना जमिन दाखवण्याची वेळ आलीय”; अमित शहांचा शिवसेनेवर हल्लाबोल
त्यानंतर रात्री बारा नंतर सुधीर मुनगंटीवार यांनी रूग्णालयात भेट दिली. तसेच त्या शेतकऱ्याची विचारपूस केली. व त्यांना योग्य उपचार कऱण्याच्या सुचना दिल्या. यावेळी उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल यांना नियमानुसार जास्तीत जास्त आर्थिक मतद करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांचा हा दौरा सध्या प्रचंड चर्चेत होत आहे.
रानडुकराने गंभीर जखमी केलेल्या चुनाळा येथील शेतकरी अजय नत्थु कार्लेकर यांची 3 सप्टेंबर रोजी रात्री 12 वा. नंतर दवाखान्यात जाऊन भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी उप विभागीय वन अधिकारी अमोल गर्कल यांना नियमानुसार जास्तीत जास्त आर्थिक मदत करण्याच्या सुचना दिल्या. @InfoChandrapur pic.twitter.com/xX0y1ifqfV
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) September 5, 2022
Read also
- “आम्ही पाठवलेली यादी रद्द केली, अन् इडी सरकार येताच..;” नाना पटोलेंचा राज्यपालांवर निशाणा
- “तुम्ही काय आम्हाला जमीन दाखवणार, आम्हीच तुम्हाला जमिनीवर आणू”
- “शिवसेना, शिंदे गट की मनसे, बघू कोणाचा मेळावा मोठा होतो”
- “दया, कुछ तो गडबड है”; नरेश म्हस्केंनी अजित पवारांना डिवचलं
- “आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक माना अन्..”; फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आव्हान