नवी दिल्ली : कृषी कायद्यांवरून शेतकऱ्यांची नाराजी ओढावणाऱ्या केंद्र सरकारने सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. मोदी सरकारचा हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. या निर्णयामुळे सहकारी संस्था बळकट होतील. परिणामी शेतकरीही आर्थिकदृष्ट्या सक्षम होईलच तसेच सरकारवरील विश्वासही वाढेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शरद पवार आणि दिलीप कुमारांच्या मैत्रीत संजय दत्तमुळे निर्माण झाला होता दुरावा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा असलेल्या सहकार भारतीने स्वतंत्र सहकार मंत्रालयाची मागणी सातत्याने केली होती. सहकार भारतीचे डॉ. उदय जोशी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, सहकारी संस्थांना अनेक फायदेमिळतील. देशभरात कृषी, मत्स्य, डेअर, साखर कारखाने व बॅंकांसह ५५ प्रकारच्या सहकारी संस्था आहेत. त्यांच्यावर राज्याचे नियंत्रण आहे. आता केंद्रीय मंत्रालयाची स्थापना झाल्यामुळे त्यांना अधिक स्वायत्तता मिळेल.
आंबिल ओढाच्या बेकारयदेशीर कृतीची चौकशी करा; नितिन राऊत यांनी घातले पुणे महापालिकेच्या कारभारात लक्ष
पुरेशी संसाधने उपलब्ध नसलेले गोरगरिब, निर्बल तसेच शोषित लोकांकडून सहकाराच्या माध्यमातून एकमेकांना मदत करुन काम करतात. भविष्यात सहकारी तत्त्वावर शेती होणार आहे. त्यामुळे सहकारी संस्थांचे देशाच्या अर्थव्यवस्थेतील योगदानही वाढेल, अशी अपेक्षा आहे.
प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीपासून दूर, प्रभारी अध्यक्ष म्हणून रेखा ठाकूर यांनी स्वीकारला पदभार
नव्या मंत्रालयामुळे सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रशासनिक तसेच कायदेशीर चौकट उपलब्ध होईल. सर्वसामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या सहकारी संस्थांसाठी ‘ईज ऑफ डूइंग बिजनेस’ तत्त्वावर काम होईल. त्यामुळे देशभ्रात सहकार चळवळ अधिक बळकट होईल. सहकार क्षेत्राला अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने गृहमंत्री अमित शहा यांना या मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी गुजरातमध्ये सहकार क्षेत्रात भरीव काम केले आहे. तसेच पक्षाच्या सहकार कार्यकारिणीचेही ते पदाधिकारी राहिले आहेत.
Read Also :
- अजून एक जमीन प्रकरण खडसेंना भोवणार?, ईडीकडून पाळेमुळे शोधायला सुरुवात
- ‘राम’भक्त मोदींनी नव्या मंत्र्यांना घालून दिली ‘लक्ष्मण’रेषा, या ३ तत्त्वांच्या पलीकडे जाल तर, खबरदार!
- मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी नाराज? अन् संतापलेल्या फडणवीसांनी पत्रकाराला…
- आंबिल ओढाच्या बेकारयदेशीर कृतीची चौकशी करा; नितिन राऊत यांनी घातले पुणे महापालिकेच्या कारभारात लक्ष
- राऊतांच्या टीकेला राणेंचे जशास तसे उत्तर, म्हणाले संजय राऊतांना लवकरच कळेल…