मुंबई : भोसरी एमआयडी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी, एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना, मंगळवारी मध्यरात्री ईडीने अटक केली. यांनतर तब्ब्ल १३ तास कसून चौकशी केल्यानंतर, ईडीने त्यांना बेड्या ठोकल्या आणि त्यांची रवानगी १२ जुलैपर्यंत ईडीच्या कोठडीत करण्यात आली आहे. या अटकेच्या कारवाईनंतर ईडीने, खडसेंनाही समन्स बजावलं आणि सकाळी ११च्या सुमारास ते कार्यालयात दाखल झाले.
जावयाला समोर बसवून खडसेंची, ईडीकडून ९ तास मॅरेथॉन चौकशी; काय घडले, वाचा सविस्तर
दरम्यान, ईडीने तब्ब्ल ९ तास खडसेंची चौकशी केली असून, अटकेत असलेले त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना समोर बसवून, त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच, ४ कथित कंपन्यांतून ‘बेसकोम बिंट्कॉन’ कंपनीमार्फत वर्ग करण्यात आलेल्या रकमेबद्दलही त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली असल्याची माहिती आहे. मात्र, या मॅरेथॉन चौकशीनंतर, ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यावर, खडसेंनी माध्यमांशी बोलणं टाळलं आणि थेट आपल्या गाडीत बसून रवाना झाले.
“पुणे महापालिकेवर महाविकास आघाडी आणायला हवी”, संजय राऊत यांची शिवगर्जना
यातच आता अजून एका भूखंड घोटाळ्याप्रकरणी खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भोसले जमीन प्रकरण महागात पडण्याची शक्यता असून, ईडीनं पुण्यातील २ महसूल अधिकाऱ्यांना यासाठी चौकशीला बोलावलं होतं, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. खडसेंनी भोसलेंच्या जमिनीसंदर्भात काढलेल्या ऑर्डरची ईडीने माहिती मागवली आहे. त्यामुळे, आता अविनाश भोसले यांची देखील पुन्हा एकदा चौकशी खडसेंच्या अनुषंगाने केली जाण्याची शक्यता आहे
दुसरीकडे काल चौकशीनंतर खडसेंच्या वकिलांनी माध्यमांसमोर येऊन, या चौकशीबद्दल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “खडसेंची आजची चौकशी पूर्ण झाली आहे. आम्ही ईडीला सर्व प्रकारचं सहकार्य दिलं आहे. त्यांच्या संपत्तीची संपूर्ण चौकशी करण्यात आली आहे. ईडीला जी कागदपत्रे हवी होती, ती देण्यात आली आहेत. इतर कागदपत्रे जमा करण्यासाठी, १० दिवसांचा कालावधी मागितला आहे. पुढेही जेव्हा चौकशीसाठी आम्हाला बोलावण्यात येईल, तेव्हा आम्ही हजर राहू,” असं ते म्हणाले आहेत.
Read Also :
- ‘राम’भक्त मोदींनी नव्या मंत्र्यांना घालून दिली ‘लक्ष्मण’रेषा, या ३ तत्त्वांच्या पलीकडे जाल तर, खबरदार!
- मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी नाराज? अन् संतापलेल्या फडणवीसांनी पत्रकाराला…
- आंबिल ओढाच्या बेकारयदेशीर कृतीची चौकशी करा; नितिन राऊत यांनी घातले पुणे महापालिकेच्या कारभारात लक्ष
- राऊतांच्या टीकेला राणेंचे जशास तसे उत्तर, म्हणाले संजय राऊतांना लवकरच कळेल…
- प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीपासून दूर, प्रभारी अध्यक्ष म्हणून रेखा ठाकूर यांनी स्वीकारला पदभार