पुणे : आगामी काळात राज्यात महापालिकेच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय नेते पक्षाची मोर्चाबांधणी करताना दिसत आहे. अशातच आता राजकीय पक्ष एकमेकांना आपल्या पक्षात खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि मनसेला जोरदार धक्के देत दोघांना आपल्या पक्षात खेचून घेतलं आहे.
“टोमणे सभेला अटी-शर्ती आहेत का?”, मनसेचा शिवसेनेला पुन्हा टोमणा
चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पुणे शहर युवक उपाध्यक्ष आनंद शेजवळ आणि मनसे प्रभाग क्र. 16 चे अध्यक्ष प्रताप जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी यावेळी त्यांनी पक्षात त्यांचं स्वागत केलं आहे. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकारी देखील उपस्थित होते. तसेच महापालिकेतील सभागृह नेते गणेश बीडकर यांची देखील उपस्थिती होती.
“हेडलाईन मिळवण्यासाठी नाना पटोलेंचं वक्तव्य”; नाना पटोलेंच्या वक्तव्याला अजित पवारांचं प्रत्युत्तर
पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम असल्याचं मला सांगण्यात आलं. एखाद्य हॉलमध्ये कार्यक्रम असेल आणि 50 लोक असतील असं मला वाटलं होतं. परंतु संख्या बंघून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली असं वाटू लागलं आहे. गणेश बीडकर आणि भाजपच्या प्रेमापोटी एवढ्या मोठ्या संख्येने हे लोक आले आहेत. हा प्रवेशाचा मोठा कार्यक्रम होत आहे. दोन तरूण कार्यक्रत्यांना लवकर कळालं की राजकीय काम करायचं असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही,असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील वाद दिल्लीत जाणार! राष्ट्रवादी-भाजप संबंध उघडे पाडण्याचा पटोलेंचा इशारा
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये देखील सध्या अनेक राजकीय नेत्यांचे पक्षप्रवेश होत आहेत. भाजपचे बेळगावातील माजी खासदार प्रभाकर कोरे कित्तुरमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शरद पवार देखील या क्रार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे कोरे हे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also:
- ‘राज ठाकरे असुरक्षित? राज ठाकरेंना तात्काळ संरक्षण द्या’; मिलिंद एकबोटे यांची मागणी
- “संजय राऊत चिरकूट माणूस… त्यांना मुंगीही धमकी देणार नाही…”; मनसेने केली टिंगल
- “कृपा करुन शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नका”; अजित पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन
- भाजपने आखली रणनीती; शिवसेनेला घेरण्यासाठी आता अमित शहा येणार !
- संभाजी राजे राज्यसभेची निवडणुक अपक्ष म्हणून लढविणार; ‘या’ संघटनेची केली मोठी घोषणा