कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत, जीएसटीच्या रकमेच्या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला असून, ‘चंद्रकांत पाटलांची अवस्था म्हणजे “विनाशकाले विपरीत बुद्धी” अशी झाली असल्याची टीका त्यांनी केली आहे.
याबाबत अधिक बोलताना त्यांनी, ‘चंद्रकांत दादांना दुर्देवाने मंत्रिमंडळात नाहीत. त्यामुळे त्यांना जीएसटीची खरी आकडेवारीच माहिती नाही. केंद्राकडून राज्याला जीएसटीचे २४ हजार कोटी येणे बाकी आहे. आम्ही सत्तेत असल्याने आमच्याकडे अधिकृत आकडेवारी आहे. ते आमचं आम्हालाच माहिती आहे,’ असं सांगितलं.
तसेच, ‘आम्ही जेव्हा पंतप्रधानांना भेटलो, तेव्हा मुख्यमंत्र्यांची सही असलेलं मागण्यांचं पत्रं आम्ही त्यांना दिलं. त्यातही हा आकडा आम्ही नमूद केला आहे. कसं आहे काही लोकांना काही माहितीच नसतं. त्यामुळे त्यांना काहीही बोलण्याची सवय असते. आपल्याकडे “विनाशकाले विपरीत बुद्धी” अशी म्हण आहे. सध्या काही लोकांची अशीच अवस्था झाली आहे,” असा सणसणीत टोला त्यांनी चंद्रकांतदादांना लगावला आहे.
Read Also :
- भक्ती, शिस्त व शक्तीचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे वारी; संत मुक्ताई पालखीचा प्रस्थान सोहळा उत्साहात
- राम मंदिर ट्रस्ट घोटाळा : सरसंघचालकांनी खुलासा करावा- संजय राऊत
- संभाजीराजेंच्या आंदोलनाला माझा ठाम पाठिंबा; आरक्षण देणे ठाकरे सरकारची जबाबदारी
- उद्धव ठाकरेच राहणार की राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार? सुप्रिया सुळे म्हणतात…..
- पुणेकरांनो नवीन नियम पाळा, महामारीपासून बाधित होणे टाळा!