पुणे : राज्यातील अनेक जिल्ह्यांना कडक निर्बंधासह लॉकडाऊनपासून तूर्तास दिलासा मिळाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे. पुणे शहरातील दैनंदिन जीवनसुद्धा आता पूर्वपदावर येत असून, महामारीची परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे.
या पार्श्वभूमीवर, शहरातील निर्बंधांमध्ये शिथिलता आणली असून, सध्या पुण्याचा बाधित होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५% आणि त्याच्या खाली आहे, यामुळे हे निर्बंध कमी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. त्यानुसार आता आजपासून पुण्यात खालील नियम लागू करण्यात आले आहेत.
काय आहेत पुणेकरांसाठी नवे निर्बंध…
- आजपासून सं.७ वाजेपर्यंत दुकानं, तर हॉटेल्स, बार आणि रेस्टोरंट (५०% टक्के क्षमतेनं खुली) रा.१० वाजेपर्यंत आणि पार्सल सेवा रा.११ पर्यंत सुरू राहणार.
- मॉल्स, थिएटर्स, नाट्यगृह ५०% टक्के क्षमतेनं खुली राहणार.
- उद्याने आणि क्रीडा मैदाने स.५ ते ९ आणि सं.४ ते ७ वेळेत तसेच, आऊटडोअर स्पोर्ट्स, क्रीडांगणे देखील स.५ ते ९ आणि सं.५ ते ७ या वेळेत खुली राहणार.
- अत्यावश्यक सुविधा वगळता इतर दुकाने शनि.-रवि. बंद राहणार.
- अत्यावश्यक सुविधा वगळता इतर दुकाने आणि हॉटेल्सच्या विकेंड लॉकडाऊनबाबत निर्णय, शुक्र.१८ जून रोजी आढावा घेतल्यांनंतर दिला जाणार.
- शहरात रा.१० पासून संचारबंदी.
- अभ्यासिका, वाचनालये ५०% टक्के क्षमतेनं सं.७ पर्यंत सुरू राहणार.
- राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी, ५० लोकांच्या उपस्थितीत सं.७ वाजेपर्यंत आयोजित कार्यक्रम करायला परवानगी.
- लेव्हल ५ श्रेणीत असलेल्या ठिकाणी ई-पास आवश्यक.
- शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू.
- खाजगी कार्यालयं ५०% टक्के क्षमतेनं सुरु.
Read Also :
- अजित पवारांच्या अज्ञात वासाचे केंद ‘अंबालिका’त भेट झाल्याचे वृत्त माजी मंत्री राम शिंदे यांनी फेटाळले
- “दिशाभूल करणं छत्रपती घराण्याच्या रक्तात नाही”, मराठा आरक्षणावर उदयनराजेंनी मांडली रोखठोक भूमिका
- मुख्यमंत्रिपद मागितले तर योग्य भूमिका घेणार; नाना पटोलेंचा स्पष्ट इशारा
- मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहण्याचा सगळ्यांना अधिकार आहे; अजितदादांचा पटोलेंना टोमणा
- ‘केंद्राकडे बोट दाखवून आघाडी सरकार आपली भूमिका टाळू शकत नाही, राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी’- शाहू छत्रपती