नाशिक : नुकत्याच सांगता झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजप नेते आणि राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी नेते, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या दोघांच्यात रंगलेला कलगीतुरा संपूर्ण राज्याने उघड्या डोळ्याने पहिला.
अधिवेशातील राड्यानंतर आमदार भास्कर जाधव यांना सुरक्षा, गृह खात्याचा निर्णय
दरम्यान, यानंतर आता पुन्हा दोघे एकमेकांसमोर उभे ठाकले असून, नाशिक शहर बससेवा लोकार्पण सोहळ्याच्या वेळी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले. तसेच, फडणवीसांसोबत यावेळी, गिरीश महाजन आणि जयकुमार रावळ देखील उपस्थित होते. या बससेवा लोकार्पण सोहळ्यासोबतच, सिटीलिंक बस मोबाईल ऍप्लिकेशन, शहर बससेवा वेबसाईट, याचंही या दोन्ही नेत्यांच्या हस्ते ऑनलाइन उदघाटन करण्यात आलं. तसेच, यावेळी ‘जलनीती’ या महापौर सतीश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचेही अनावरण करण्यात आले.
‘’ज्यांना तुम्ही शत्रू समजता त्यांना आम्ही किंमत ही देत नाही’’ निलेश राणे म्हणतात…
एकीकडे दोन्ही नेते मंचावर उपस्थित असताना, कार्यक्रमस्थळी दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी, या लोकार्पण सोहळ्यासाठी, फडणवीस येणार असल्याने त्यांच्या स्वागताच्या अनुषंगाने भाजप कार्यकर्त्यांनी लावलेले फलक, एकाएकी महापालिकेने हटविल्याने भाजप कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावरच तीव्र संताप व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाणूनबुजून हे फलक काढले असल्याची चर्चा देखील यावेळी कार्यकर्त्यांमध्ये सुरु होती.
भोसरी जमीन आर्थिक घोटाळा: जावयाच्या अटकेनंतर आता एकनाथ खडसेंना दणका, ईडीकडून चौकशीचे समन्स
या प्रकरानंतर, काढण्यात आलेले हे फलक पुन्हा लावण्यात यावे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. केवळ पालकमंत्री छगन भुजबळ यांचे फोटो, त्या फलकावर नसल्याने ते हटविले असल्याच्या आरोप बाळासाहेब पाटील, माजी नगरसेवक कुणाल वाघ, सचिन कुलकर्णी यांनी केला आहे. तसेच, यावेळी महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांना यानी फोन केला असता, त्यांनी “आयुक्तांना हा सगळा प्रकार सांगा” असे म्हणत फोन कट केला. त्यामुळेही कार्यकर्त्यांच्या संतापात भर पडली.
Read Also :
- आजारी खडसेंची ईडीकडून चौकशी सुरु, दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणूका पुढे ढकला…ठाकरे सरकारकडून पुन्हा एकदा आयोगाला विनंती
- ‘बाळ’कडू प्यायलेला कोकणचा भूमिपुत्र, आता ‘मोदीं’चा मंत्री; असा आहे राजकीय प्रवास
- चर्चा होती राजीनाम्याची, मात्र लॉटरी लागली थेट राज्यमंत्रीपदाची! मोदींकडून ‘दाजींना’ मोठे गिफ्ट
- एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल; भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी खडसे दाम्पत्याला अटक होणार?