नाशिक : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेतल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना खासदार संभाजीराजे यांनी नवीन पक्ष काढण्याचे संकेत दिले होते. संभाजीराजे खासदारकीचा राजीनामा देऊन नवीन पक्ष काढणार ? अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन स्वत:चा पक्ष काढला तर त्यामध्ये ते मला घेणार आहेत, या वृत्ताबद्दल मला काहीही माहिती नाही, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
खासदार छत्रपती संभाजीराजे नवा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. याबाबत मला काहीही माहिती नाही. ते स्वतंत्र पक्ष काढणार असतील तर त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. मात्र मराठा आरक्षणासंदर्भात सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन तोडगा काढण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
संभाजी महाराज वेगळा पक्ष काढणार का याबाबत मला माहिती नाही. कोणी पक्ष काढायचा किंवा नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तसेच संभाजीराजेंनी वेगळा पक्ष काढलाच तर ते मला त्या पक्षात घेणार आहेत याबाबत मलातरी माहिती नाही. सर्वांच्या मतांनुसार एक ठोस प्रस्ताव तयार करून समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवणे. तो एक चांगला प्रयत्न त्यांनी केला. आता त्यांना नवा राजकीय पक्ष काढायचा असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे छगन भुजबळ म्हणाले.
Read Also :