औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज पैठण येथे दौरा असून त्यांची आज जाहीर सभा होणार आहे. परंतु या सभेआधी एकनाथ शिंदे वादाच्या भोवऱ्यात सापडेल आहेत. सभेला 250 रूपये देऊन गर्दी जमा केल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. यावरून राज्यातील विरोधी पक्षांनी चांगलीच टिका केली आहे. यातच एक पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी भन्नाट किस्सा घडला आहे.
“गर्दी जमवण्यासाठी सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर ही वेळ आली असेल तर..;” अन् अजित पवार संतापले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आज विमानतळावर आगमन झालं. त्यावेळी शिंदे सरकारमधील अनेक नेते, मंत्री मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी हजर होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ज्या रस्त्यांनी ताफा जाणार होता. त्याठिकाणी देखील लोक मोठ्या प्रमाणात स्वागतासाठी उपस्थित होते. याचवेळी एकाठिकाणी मुख्यमंत्र्यांची लाडू, पेढ्या सोबत तुला केली जाणार होती, मात्र ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी ती नाकारली.
“शरद पवार अन् अजित पवार एकाच नाण्याच्या दोन बाजू, त्यामुळे दानवसारखं बरळू नका”
त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा त्याठिकाणाहून निघाला असता. जमलेल्या लोकांनी लाडू,पेढ्यासाठी मोठी झुंबड उडवली. अनेकांनी लाडू पेढा घेऊन पळ काढला. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबाद दौरा सध्या विविध गोष्टीमुळे चर्चेत ठरत आहेत. औरंगाबाद ते पैठण दरम्यान एकनाथ शिंदे यांनी सात कार्यक्रम केले आहेत.
Read also
- “भुमरेंच्या मागच्या सभेला केवळ 110 लोकं होती, यावेळी तो फ्लॉफ शो होऊ नये म्हणून कदाचित”
- “काही दिवसांनी पटोलेंच भाजपमध्ये येतील पण आम्ही त्यांना घेणार नाहीत”
- “फेसबुक लाईव्हवाला घरबशा पंतप्रधान लोकांच्या नशिबात नव्हता”
- “जयंत पाटील, त्यानंतर शरद पवारांचं भाषण झालं, पण तुमचं भाषण नाही”, अजित पवार म्हणाले,.
- “तेव्हा महाराष्ट्राचा अपमान झाल्याचा कांगावा कुणीतरी मोठ्या नेती ने केला होता”; चित्रा वाघ यांची सुळेंवर टिका