औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज औरंगाबाद येथील पैठण येथे जाहीर सभा होत आहे. या सभेला राज्याचे मंत्री आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देखील उपस्थित आहेत. मात्र या सभेला अंगणवाडी सेविकांना जाहीर सभेत उपस्थित राहण्याचे आदेश दिल्याने एकच वाद निर्माण झाला आहे. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“अजित पवार नाराज नाही, ते लघूशंकेला गेले होते”; नाराजी नाट्यमयानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
७ सप्टेंबर २०२२ ला एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या औरंगाबादमधील अधिकाऱ्यांनी खुशाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या १२ सप्टेंबरच्या पैठण मतदारसंघातील सभेला प्रकल्पातील सर्व पर्यवेक्षिका, ४३ गावांमधील अगंणवाडी सेविका, मतदनीसांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनाही सुचना करण्यात आल्या आङेत. महाराष्ट्रात अशी पद्धत कधीच नव्हती असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
“भविष्यात देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे”
एकनाथ शिंदेंची राजकीय सभा असेल तर अशाप्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांना बोलावण्याचं काहीच कारण नाही. महाराष्ट्रात हे पहिल्यांदा घडत आहे. अगंणवाडी सेविका, मदतनीस सभेला गेल्या तर तेथील मुलांनी काय करायंच, ते कुठे जाणार ? त्या मुलांकडे लक्ष कोण देणार ? गर्दी जमवण्यासाठी सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर ही वेळ आली असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
“काॅंग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष, नितीन गडकरींनी काॅंग्रेसमध्ये यावं”; नाना पटोलेंची गडकरींना ऑफर
दरम्यान, संदिपान भुमरे यांच्या मतदार संघात एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होत आहे. परंतु सभेपुर्वी यावर प्रखर शब्दात टिका केली जात आहे. त्याचबरोबर सभेसाठी ३०० रूपये देऊन लोक जमा केलं जात असल्याची एक ऑडिओ क्लिप देखील सध्या व्हायरल होत आहे.
Read also
- “शरद पवार अन् अजित पवार एकाच नाण्याच्या दोन बाजू, त्यामुळे दानवसारखं बरळू नका”
- “शिवसेनेनं जे अडीच वर्षात पेरलंय, ते आता उगवतंय”
- “उद्धव ठाकरे भविष्यात पंतप्रधान होतील, याच भीतीने भाजपने ‘शिवसेना’ फोडली”
- “राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्याच नावावर चालतो”; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
- “आम्हाला असं वाटतं की आम्ही बारामती जिंकू”; चंद्रशेखर बावनकुळे