पुणे : भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटलांना शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट पदाची जबाबदारी दिल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद रिक्त झालं. त्यानंतर भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच बारामती दौरा केला आणि शरद पवारांना आव्हान दिलं. आता चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी दौरा करीत आहेत. तसेच भाजपला आगामी निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा मिळणार असल्याचा दावा देखील करताना ते दिसत आहेत.
“देवेंद्र फडणवीस खरे हिंदूचे नवे हिंदुह्दयसम्राट आहेत”; नितेश राणे
बारामतीमध्ये घडी बंद पाडण्यासाठी आम्ही काम करतोय, तीन दिवस निर्मला सितारमण मुक्कामी येणार आहेत. अठरा महिन्यात सहा वेळा त्या येणार आहेत. तेथे घडी बंद पाडण्याची वेळ आली आहे. बारातमी शहर म्हणजे बारामती लोकसभेचा विकास होत नाही. दौंड, पुरंदर, हडपसरचं काय? आम्हाला असं वाटतं की आम्ही बारामती जिंकू असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
“सत्तेची हवा डोक्यात गेली की अशी तोंडघशी पडायची वेळ येते”
2024 ला जनता ठरवेल. तीन महिन्यातून एकदा बारामतीला जाणार आहे. त्यामुळे बारामतीमध्ये घडी बंद पाडू, या वक्तव्यावर ठाम आहे. त्यांना जर बारामतीचा विकास केला असेल तर उपकार केले आहेत का ? असा सवाल त्यांनी केला आहे. 40 वर्ष तुम्ही सत्ता राबवली. केंद्रात तुमचं सरकार होतं. त्यामुळे बारामतीमध्ये विकास केला असेल तर बारामतीकरांवर उपकार केले नाहीत. ती जबाबदारीच आहे. बारामतीकर घडी बंद पाडतील असा मला विश्वास असल्याचं बावनकुळे म्हणाले.
“विरोधकांना कोंडीत पकडणारे तोंडावर चांगलेच आपटले”; रूपाली पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आपण मानले पाहिजे. त्यांच्यामुळेच आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना मंत्रिपद मिळाली. असंही ते म्हणाले. तसेच समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत दिवा लावणे हा आमचा हेतू आहे. पुढच्या दोन महिन्यात सगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रवास करणार आहे. रामदास तडस यांनी शरद पवार यांच्या सिस्टिमला हरवलं आहे. कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून चांगले काम होईल. असंही ते म्हणाले.
Read also
- “अजित पवार नाराज नाही, ते लघूशंकेला गेले होते”; नाराजी नाट्यमयानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
- “भविष्यात देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे”
- “शिवसेना अन् संभाजी ब्रिगेड युती पहिली निवडणुक सोलापूरातून लढणार”
- “काॅंग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष, नितीन गडकरींनी काॅंग्रेसमध्ये यावं”; नाना पटोलेंची गडकरींना ऑफर
- “फडणवीस इस्लाम कबूल करत आहेत की रऊफला कुंभमेळ्याचे निमंत्रण देत आहेत ?”; सुषमा अंधारे