मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबत याकुब मेमनचा भाऊ रऊफ यांच्या बैठकीचा व्हिडीओ व्हायरल केला. त्यानंतर या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली. यावर किशोरी पेडणेकरांनी भाजपला जशास तसं उत्तर दिलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण सध्या याकुब मेमनच्या कबरीवर चांगलचं तापलं आहे.
“आमच्यामध्ये हिंमत होती म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो”
याकुब मेमनच्या कबरीचं सुभोभीकरण कऱण्यात आलं आहे. यावरून भाजपने किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर भाजपने पेडणेकरांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी राऊफ यांच्यासोबत राज्यपाल, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांचे फोटो ट्विट करत भाजपला जोराचा झटका दिला आहे. यावर आता कारवाई करणार का ? असा सवाल देखील पेडणेकरांनी भाजपला केला आहे.
“ते दहीहंडी अन् गणेशोत्सवाच्या शुभेच्छा द्यायला देखील विसरले”; भाजपने ठाकरेंना पुन्हा डिवचलं
त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी देखील भाजपवर टिका केली आहे. त्या म्हणाल्या की, विकास कामे सोडून, महत्वाचे प्रश्न सोडून राजकारण भरकटवणारे, खालच्या दर्जेचे राकारण करणारे किती वेळा तोंडावर आपटणार? निर्लज्जच म्हणा नुसती विरोधकांना नको त्या कारणांनी पकडण्याचा प्रयत्न तोंडावर चांगलेच आपटले असा हल्लाबोल रूपाली पाटलांनी भाजपवर केला. तसेच आता तरी सुधारा खळखळ असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
शिंदे गट मनसेमध्ये विलीन होणार ? आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा
दरम्यान, राऊफ मेमनसोबत बडा कब्रस्तानमध्ये किशोरी पेडणेकरांची बैठक झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. या बैठकीचा एक व्हिडीओ भाजपने व्हायरल केला आहे. यामध्ये किशोेरी पेडणेकर राऊफ मेमनसोबत चर्चा करताना दिसत आहेत. त्याचसोबत या व्हिडीओमध्ये जवळपास 20 ते 25 लोक देखील असल्याचं दिसत आहेत. त्यामुळे सध्या या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं आहे.
विकास कामे सोडून,महत्वाचे प्रश्न सोडून राजकारण भरकटवणारे,खालच्या दर्जेचे राजकारण करणारे किती वेळा तोंडावर आपटणार ?
निर्लज्जच म्हणानुसती विरोधकांना नको त्या कारणांनी पकडण्याचा प्रयत्न तोंडावर चांगलेच आपटले
आता तरी सुधारा खळखळ@BhatkhalkarA pic.twitter.com/USPJTRcouv— Rupalipatilthombare (@Rupalispeak) September 10, 2022
Read also
- पेडणेकरांचा भाजपच्या आरोपांच्या बॉलवर षटकार..! एका झटक्यात भाजपला केलं चारी मुंड्या चीत
- “सरकार, विरोधी पक्ष, याकडे राजकारणापलिकडे जाऊन बघा”; रोहित पवारांना चिंता
- “याकुब मेमनच्या भावाचा राज्यपालांसोबत फोटो”, काॅंग्रेसचा भाजपला सवाल
- “पितृपक्षात याकुब मेमन खाली येईल अन् याचे उत्तर देईल”; चित्रा वाघ यांचा पेडणेकरांवर हल्लाबोल
- “हजारो कोटींचा निधी बारामतीला ओरबडून घेतला, पण बाकी महाराष्ट्राचं काय ?”