मुंबई : याकुब मेमनच्या कबरीवरून सध्या राज्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झालं आहे. याकुब मेमनच्या कबरीचं अलिकडेच सुशोभीकरण करण्यात आल्यानंतर हा वाद आणखीच चिघळला असून भाजप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत. तर याला शिवसेने देखील जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. यावरून काॅंग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपला सवाल केला आहे.
“गेल्या निवडणुकीत चंद्रकांत दादा थोडक्यात जिंकले”, आता पार्सल कोथरूड ते कोल्हापुर जाणार
सचिन सावंत यांनी मुंबईतील कबरी संदर्भात एक पत्र देखील जोडलं आहे. त्यामध्ये त्यांनी १७ कबरींचा उल्लेख आहे. तसेच त्यांनी असं म्हटलं आहे की, बडा कब्रस्तानची जमीन खासगी आहे. राज्य सरकार वा महानगरपालिकेशी संबंध नाही. जमीन ट्रस्टच्या अखत्यारीत आहे. ट्रस्टच्या म्हणण्यानुसार त्या जागी १७ कबरी आहेत. १७ कबरींची मजार होते का ? अनेक ठिकाणी मार्बल लावले आहे. मार्बल लावलेल्या जागेचे भाजप सरकार काय व कसे करणार ते सांगा? असा सवाल सचिन सावंत यांनी भाजपला केला आहे.
“बारामतीने देशाला नाही पण पवार कुटुंबाला विकासाची दिशा दाखवली”
तसेच आज भाजप नेते अतुल भातखळकरांनी देखील यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात ते असं म्हणताहेत की, तत्कालीन मुख्यमंत्री जनाब उद्धव ठाकरे यांच्या विशेष कृपा प्रसादाचे मानकरी दाऊद टोळीचे मालमत्ता प्रमुख नवाब मलिक यांनीच याकुबच्या कबरीचे प्रकरण दडपडे होते. उद्धव ठाकरे हे मेमन कुटुंबियांवर एवढे मेहेरबान का होते ? वक्फ बोर्डाकडे तक्रार झाल्यानंतरही सरकार अळीमिळी करून का बसले?असा प्रश्न भातखळकारंनी केला आहे.
“इथं आम्हाला पेटी बघायला मिळेना अन् विरोधक खोके दाखवताहेत”; शाहाजी पाटील
दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा याकुब मेमनचा भाऊ रौफ यांच्यासोबतच्या बैठकीचा एक व्हि़डीओ व्हायरल होत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून सचिन सावंत यांनी देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागलं आहे.
रऊफ मेमन ते हेच का?….🤔 pic.twitter.com/QCyg62xyAG
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 10, 2022
बड़ा कब्रस्तानची जमीन खासगी आहे. राज्य सरकार वा महानगरपालिकेशी संबंध नाही.
जमीन ट्रस्टच्या अखत्यारीत आहे. ट्रस्टच्या म्हणण्यानुसार त्या जागी १७ कबरी आहेत. १७ कबरींची मजार होते का?
अनेक ठिकाणी मार्बल लावले आहे. मार्बल लावलेल्या जागेचे भाजपा सरकार काय व कसे करणार ते सांगा. pic.twitter.com/8z37CzhJF0— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 10, 2022
Read also
- “पितृपक्षात याकुब मेमन खाली येईल अन् याचे उत्तर देईल”; चित्रा वाघ यांचा पेडणेकरांवर हल्लाबोल
- “हजारो कोटींचा निधी बारामतीला ओरबडून घेतला, पण बाकी महाराष्ट्राचं काय ?”
- “आमच्यामध्ये हिंमत होती म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो”
- “ते दहीहंडी अन् गणेशोत्सवाच्या शुभेच्छा द्यायला देखील विसरले”; भाजपने ठाकरेंना पुन्हा डिवचलं
- शिंदे गट मनसेमध्ये विलीन होणार ? आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा