मुंबई : 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दहशतवादी याकुब मेननच्या कबरीवरून सध्या राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. दक्षिण मुंबईतील मरीन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनच्या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले आहे. फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आली आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
“बारामतीने देशाला नाही पण पवार कुटुंबाला विकासाची दिशा दाखवली”
याकुब मेमनच्या कबरीचा मुद्दा गाजत असताना मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एका व्हिडीओमध्ये किशोरी पेडणेकर यांच्यासह याकुबचा भाऊ रौफसह एका बैठकीत बसलेल्या दिसत असल्यामुळे त्यांच्यावर आता आरोप केले जात आहेत. त्यामुळे शिवसेनेचा त्या कबरीच्या सुशोभीकरणात सहभाग होता का ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
“इथं आम्हाला पेटी बघायला मिळेना अन् विरोधक खोके दाखवताहेत”; शाहाजी पाटील
याप्रकरणामध्ये आपला कोणाशीही कोणताही संबंध नसल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. आपण महापौर असताना अनेक ठिकाणी आपल्याला जावे लागत असले. तसे आपल्याला कुणीतरी रौफ यांच्याकडे नेले असावे असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यावर पितृपक्षात याकुब मेमन खाली येईल आणि याचे उत्तर देईल म्हणून सांगू नका किशोरी ताई असं म्हणत चित्रा वाघ यांनी किशोरी पेडणेकरांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
Read also
- “हजारो कोटींचा निधी बारामतीला ओरबडून घेतला, पण बाकी महाराष्ट्राचं काय ?”
- “आमच्यामध्ये हिंमत होती म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो”
- “ते दहीहंडी अन् गणेशोत्सवाच्या शुभेच्छा द्यायला देखील विसरले”; भाजपने ठाकरेंना पुन्हा डिवचलं
- शिंदे गट मनसेमध्ये विलीन होणार ? आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा
- “गेल्या निवडणुकीत चंद्रकांत दादा थोडक्यात जिंकले”, आता पार्सल कोथरूड ते कोल्हापुर जाणार