मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीचा गड भाजप उध्दवस्त करणार असल्याचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. त्यावर बारामतीचा गड उध्दवस्त करणे हे इतकं सोपं वाटतं का ? असा राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केला असून बारामतीने देशाला विकासासाठी दिशा दाखवली असं म्हटलं आहे. त्यावर आता रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी लंकेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
“धर्म आणि अध्यात्म यामध्ये कोणीही राजकारण करू नये”; रोहित पवार
ज्या बारामतीने देशाला विकासाची दिशा दाखवली. राज्यात प्रत्येक झोपडी पर्यंत विकास पोचविण्याचे काम केलं. बारामतीचा गड उध्वस्त करणे हे इतकं सोपं वाटतं का ? कार्यकर्त्यांनामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न आहे अशी टिका निलेश लंके यांनी केली. त्यानंतर बारामतीने देशाला नाही पण पवार कुटुंबाला विकासाची दिशा दाखवली आहे. असा टोला सदाभाऊंनी लकेंना लगावला.
“बारामतीत माझं काम बोलतं, माझ्यापेक्षा जास्त काम करणारा बारामतीत आणा..;”
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलिकडेच बारामतीचा दौरा केला. या दौऱ्याच्या वेळी त्यांनी राष्ट्रवादीवर हल्ला बोल करीत आगामी लोकसभा निवढणुकीत यावर आम्ही ताबा मिळवू असा दावा त्यांनी करून टाकला. त्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. यातच आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या दादा शैलीत त्यांना टोला लगावला आहे.
पुण्यात नागनाथ मंडळात गणपती बाप्पाच्या आरतीनंतर अजित पवार पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी ते म्हणाले की, कुणीही बारामतीत यावं. सगळ्यांचं याठिकाणी स्वागतच करतात. बारामतीत माझं काम बोलतं. माझ्यापेक्षा जास्त काम करणारा बारामतीत आणा. त्याचा बारामतीकर नक्की विचार करतील, असंही अजित पवार म्हणाले.
Read also
- “इथं आम्हाला पेटी बघायला मिळेना अन् विरोधक खोके दाखवताहेत”; शाहाजी पाटील
- आदित्य ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांनी लावला, मानाच्या पहिल्या गणपतीच्या पालखीला हात
- “चिप पल्बिसिटीबद्दल आपण कुप्रसिद्ध आहात हे विसरू नका”; नवनीत राणांवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- “दाऊद टोळीचे माफिया हे राज्याचे वाजिरे आझम जनाब ‘घरंदाज उदौला”; भाजपचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- लव्ह जिहादच्या नावाने समाजात अशांतता पसरवण्याप्रकरणी राणांवर कारवाई करा ; काॅंग्रेसची फडणवीसांकडे मागणी