अमरावती : लव्ह जिहादच्या एका प्रकरणाबाबत खासदार नवनीत राणा यांचा पोलीस स्टेशनमधील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रकरणाबाबत नवनीत राणा यांनी पोलिस स्टेशनमध्येच पोलिसांची हुज्जत घातली. परंतु या प्रकरणात पीडित मुलगी स्वत; पळून गेल्याने या प्रकऱणाला वेगळचे वळण लागले. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी नवनीत राणा यांच्यावर कडाडून टिका केली आहे.
“भाजपमध्ये विलीन व्हा, नाहीतर स्वत:चा पक्ष काढा, जनतेला त्रास का ?” रूपाली पाटील
लव्ह जिहादच्या नावाखाली 19 वर्षीय मुलीचा अमरावती येथील रूक्मिणी नगर परिसरातून अपहरण गेल्याची तक्रार देण्यात आली. त्यानंतर नवनीत राणा आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस ठाण्यासमोर तणावाचे वातावरण निर्माण केले. याप्रकरणाची सविस्तर चौकशी केल्यानंतर पीडित मुलगी स्वत; पळून गेल्याने आणि तिच्यासोबत कुणी नसल्याचं पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी सांगितलं. त्यानंतर नवनीत राणांवर जोरदार टिका होत आहे.
“राहुल गांधींची पदयात्रा ही मायबाप जनतेच्या सेवेसाठी”; सुप्रिया सुळे
प्राथमिक चौकशीदरम्यान रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचं पीडित तरूणींनी म्हटलं आहे. त्यानंतर रूपाली पाटील यांनी राणांवर कडाडून टिका केली. त्या म्हणाल्या की, नवनीत राणा ताई आधी तोंडावर पडल्या आहे. त्यानंतर स्वत: पीडित मुलींनी यांचं राजकीय तोंडही फोडलं. थोडी लाज शिल्लक असेल तर जातीयवादी थयथयाटरागिणी महाराष्ट्र पोलीस, अमरावती शहर पोलीस यांची त्वरित माफी मागावी असं देखील रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.
“मंत्रीपदासाठी शिंदे गटात सहभागी झालो नाही, मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो”; बंडखोर आमदार
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, लाज वाटते अशा महिला लोकप्रतिनिधीची ना कोणते, गांभीर्य, ना कायदेशीर माहिती ना संवदेशीलपणा ठेवणे. सतत घाणेरडे राजकारण बोंबाबोंब, नौटंकी असं देखील त्यांनी म्हटलं आहे. काम के ना काज के, लोक शेवटी भाजपच ना काम सोडून सगळे जमते. महाराष्ट्र पोलीस बंधू, भगिनींना समाल. असं म्हणत भाजपकडे काम सोडून बोंबा, पात्र ढिगाने पडले एक झाले की एक असा हल्लाबोल देखील रूपाली पाटील यांनी केला आहे.
Navneet Ravi Rana ताई आधी तोंडावर पडल्या ;
नंतर स्वतः पीडित मुलीनी यांचं राजकीय तोंडही फोडलं …थोडी लाज शिल्लक असेल तर जातीयवादी #थयथयाटरागिणी
Maharastra Police ,Amravati City Police यांची त्वरित माफी मागावी.#लेकीचीबदनामी— Rupalipatilthombare (@Rupalispeak) September 9, 2022
Read also
- उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के..! साताऱ्यात युवासेनेचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश
- आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलेलो नाही, तर सामाजिक परिवर्तनासाठी हा पर्याय निवडला”; सुप्रिया सुळे
- “सर्व हिंदू संघटना उद्धव ठाकरेंकडे जातांना बघून आशिष शेलार बावचळले”; किशोरी पेडणेकर
- “माझी खुर्ची, माझा परिवार या पलिकडे पेंग्विन सेनेला अस्तित्व नाही”; शेलारांची टिका
- “शिंदे गट धनुष्यबाणाला इतके का घाबरले? डरपोक गट” केदार दिघेंचा शिंदेंवर निशाणा