सातारा : शिवसेनेनेच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंडकरून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे याचा फटका उद्धव ठाकरे यांना जोरदार बसण्याची शक्यता आहे. यातच आता साताऱ्यातील युवा सेने आणि युवासेना जिल्हाप्रमुख रणजित सिंह भोसले यांनी आपला पाठिंबा एकनाथ शिंदेंना जाहीर करून टाकला आहे.
“राहुल गांधींची पदयात्रा ही मायबाप जनतेच्या सेवेसाठी”; सुप्रिया सुळे
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते पक्षातंर करीत आहेत. साताऱ्यात शिंदे गटाचं बळ वाढताना दिसत आहे. कारण रणजित सिंह भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. याचा हादरा उद्धव ठाकरे यांना बसण्याची शक्यता आहे. तसेच आगामी काही काळात उद्धव ठाकरे यांना याठिकाणी अनेक आव्हाने असणार आहेत.
“मंत्रीपदासाठी शिंदे गटात सहभागी झालो नाही, मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो”; बंडखोर आमदार
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा येथील निवास्थानी रणजित सिंह भोसले यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई हे देखील उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शिंदे गटातील आमदार आणि मंत्री शंभुराज देसाई, आमदार महेश शिंदे आणि पुरूषोत्तम जाधव यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे.
“शिवसैनिकांच्या हातांवर घड्याळ बांधणार का ?” शालिनी ठाकरेंचा पेडणेकरांना सवाल
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेक कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहेत. त्याचबरोबर विजयादशमीच्या दिवशी शिवसेनेचे 10 बडे नेते देखील आपला पाठिंबा एकनाथ शिंदेंना देणार आहेत.
Read also
- आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलेलो नाही, तर सामाजिक परिवर्तनासाठी हा पर्याय निवडला”; सुप्रिया सुळे
- “सर्व हिंदू संघटना उद्धव ठाकरेंकडे जातांना बघून आशिष शेलार बावचळले”; किशोरी पेडणेकर
- “माझी खुर्ची, माझा परिवार या पलिकडे पेंग्विन सेनेला अस्तित्व नाही”; शेलारांची टिका
- “शिंदे गट धनुष्यबाणाला इतके का घाबरले? डरपोक गट” केदार दिघेंचा शिंदेंवर निशाणा
- “भाजपमध्ये विलीन व्हा, नाहीतर स्वत:चा पक्ष काढा, जनतेला त्रास का ?” रूपाली पाटील