मुंबई : 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दहशतवादी याकुब मेननच्या कबरीवरून सध्या राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. दक्षिण मुंबईतील मरीन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनच्या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले आहे. फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई केली. मात्र भाजपने आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलेलो नाही, तर सामाजिक परिवर्तनासाठी हा पर्याय निवडला”; सुप्रिया सुळे
भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, जनाब सेनेचा कांगावा उघड झाला आहे. 2020 मध्ये टायगर मेमनने कब्रस्तानच्या ट्रस्टीला धमकावले होते. परंतु दाऊद टोळीचे माफिया हे राज्याचे वाजिरे आझम जनाब घरंदाज उदौला यांचे जावई असल्यामुळे तक्रार करूनही कारवाई झाली नाही. त्यानंतर कबर सजवण्यात आली. तरीही शाहजादे आमच्याकडे बोट दाखवतायत. असं भातखळकरांनी म्हटलं आहे.
“सर्व हिंदू संघटना उद्धव ठाकरेंकडे जातांना बघून आशिष शेलार बावचळले”; किशोरी पेडणेकर
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, अडीच वर्षाच्या महाभकास आघाडीच्या कार्यकाळात जनाबसेना गडकिल्ल्यांवर मजारी बनवण्याचे काम करत होती. त्याच काळात याकुबची कबर सजवण्यात आली. मढमधील जमीन एकत्रिपणे लाटताना अस्लम शेख हे आदित्य ठाकरेंना याबाबत मार्गदर्शन करीत होते. असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
“माझी खुर्ची, माझा परिवार या पलिकडे पेंग्विन सेनेला अस्तित्व नाही”; शेलारांची टिका
याप्रकरणावरून भाजप नेते राम कदम यांनी याकुब मेमनच्या कबरीचे फोटो ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. हे उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने घडंतय की मुंबई प्रेमातून? महाविकास आघाडी सरकारच्या काळात या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आले. असा आरोप त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासाठी माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
Read also
- लव्ह जिहादच्या नावाने समाजात अशांतता पसरवण्याप्रकरणी राणांवर कारवाई करा ; काॅंग्रेसची फडणवीसांकडे मागणी
- “धर्म आणि अध्यात्म यामध्ये कोणीही राजकारण करू नये”; रोहित पवार
- “बारामतीत माझं काम बोलतं, माझ्यापेक्षा जास्त काम करणारा बारामतीत आणा..;”
- “थोडी लाज शिल्लक असेल तर जातीयवादी थयथयाटरागिणी पोलिसांची माफी माग”; रूपाली पाटलांचा राणांवर हल्लाबोल
- उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के..! साताऱ्यात युवासेनेचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश