पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलिकडेच बारामतीचा दौरा केला. या दौऱ्याच्या वेळी त्यांनी राष्ट्रवादीवर हल्ला बोल करीत आगामी लोकसभा निवढणुकीत यावर आम्ही ताबा मिळवू असा दावा त्यांनी करून टाकला. त्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. यातच आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या दादा शैलीत त्यांना टोला लगावला आहे.
“शिंदे गट धनुष्यबाणाला इतके का घाबरले? डरपोक गट” केदार दिघेंचा शिंदेंवर निशाणा
पुण्यात नागनाथ मंडळात गणपती बाप्पाच्या आरतीनंतर अजित पवार पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी ते म्हणाले की, कुणीही बारामतीत यावं. सगळ्यांचं याठिकाणी स्वागतच करतात. बारामतीत माझं काम बोलतं. माझ्यापेक्षा जास्त काम करणारा बारामतीत आणा. त्याचा बारामतीकर नक्की विचार करतील, असंही अजित पवार म्हणाले.
“भाजपमध्ये विलीन व्हा, नाहीतर स्वत:चा पक्ष काढा, जनतेला त्रास का ?” रूपाली पाटील
तुम्हाला एक मराठी म्हण माहित आहे का? कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नाही, ही वस्तुस्थिती आहे, नवीन नवीन अध्यक्ष झाले की हुरूप येतो, तुम्ही प्रसिद्धी केव्हा देता, ते अध्यक्ष बारामतीला न येता दुसरीकडे गेले असते, तर तुम्ही इतकी प्रसिद्धी दिली असती का ? बारामतीला गेल्यामुळेच तुम्ही बातमी केली आणि इतकी प्रसिद्धी मिळाली असंही ते म्हणाले.
“राहुल गांधींची पदयात्रा ही मायबाप जनतेच्या सेवेसाठी”; सुप्रिया सुळे
दरम्यान, केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण या देखील आगामी काही काळात बारामती दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी बावनकुळे यांनी बारामतीचा दौरा केला आहे. सलग 3 वेळा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांना हरवण्यासाठी सध्या भाजप बारामती प्रयत्न करीत आहे.
Read also
- “थोडी लाज शिल्लक असेल तर जातीयवादी थयथयाटरागिणी पोलिसांची माफी माग”; रूपाली पाटलांचा राणांवर हल्लाबोल
- उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के..! साताऱ्यात युवासेनेचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश
- आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलेलो नाही, तर सामाजिक परिवर्तनासाठी हा पर्याय निवडला”; सुप्रिया सुळे
- “सर्व हिंदू संघटना उद्धव ठाकरेंकडे जातांना बघून आशिष शेलार बावचळले”; किशोरी पेडणेकर
- “माझी खुर्ची, माझा परिवार या पलिकडे पेंग्विन सेनेला अस्तित्व नाही”; शेलारांची टिका