पुणे : पोलीस, डॉक्टर, प्रशासन त्याचबरोबर अनेक लोकांनी कोरोना काळात परिश्रम घेतले आहेत. तसेच कोरोना घालवण्यासाठी या लोकांनी कुठलीही मदत केली नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न शिंदे सरकार कदाचित करीत आहे. असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लगावला. आज पुण्यात गणपती मिरवणुकीत उपस्थित असताना त्यांनी वक्तव्य केलं आहे. शिंदे सरकारने कोरोना निर्बंध गणेश उत्सव साजरा केला त्यावर ते बोलत होते.
“माझी खुर्ची, माझा परिवार या पलिकडे पेंग्विन सेनेला अस्तित्व नाही”; शेलारांची टिका
कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने देखील राज्य सरकरांना निर्बंध लादण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे लोकांनी सहकार्य केलं त्यामुळेच कोरोना गेला असंही ते म्हणाले. त्याचबरोबर धर्म आणि अध्यात्म यामध्ये कोणीही राजकारण करू नये. या लोकांनी मदत केली आहे म्हणून कोरोना गेला आहे. उगाचच त्याचं वेगळं संदर्भ देऊ नये. असा टोला देखील त्यांनी शिंदे सरकारला लगावला.
“शिंदे गट धनुष्यबाणाला इतके का घाबरले? डरपोक गट” केदार दिघेंचा शिंदेंवर निशाणा
आम्ही देखील सत्तेत असताना काम केली आहेत. त्यामुळे त्यावर बोलणं योग्य राहणार नाही. असंही रोहित पवार म्हणाले. आज पुण्यात गणपती विसर्जनाला सुरूवात झाली असून मानाचा पहिला कसबा गणपतीची मिरवणुक सुरू झाली आहे. त्यामुळे आज पुण्यात विविध ठिकाणी बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. तसेच शहरात विविध ठिकाणी गणपती विसर्जनासाठी सोयी सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
Read also
- “बारामतीत माझं काम बोलतं, माझ्यापेक्षा जास्त काम करणारा बारामतीत आणा..;”
- “थोडी लाज शिल्लक असेल तर जातीयवादी थयथयाटरागिणी पोलिसांची माफी माग”; रूपाली पाटलांचा राणांवर हल्लाबोल
- उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के..! साताऱ्यात युवासेनेचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश
- आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलेलो नाही, तर सामाजिक परिवर्तनासाठी हा पर्याय निवडला”; सुप्रिया सुळे
- “सर्व हिंदू संघटना उद्धव ठाकरेंकडे जातांना बघून आशिष शेलार बावचळले”; किशोरी पेडणेकर