अमरावती : लव्ह जिहादच्या एका प्रकरणाबाबत खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात याप्रकरणाची चौकशी केली असता त्यांचा फोन रेकॉर्डिंग करण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर नवनीत राणा यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांची हुज्जत घातली. मात्र या प्रकऱणात पीडित मुलगी स्वत: पळून गेल्याने याप्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे.
“सर्व हिंदू संघटना उद्धव ठाकरेंकडे जातांना बघून आशिष शेलार बावचळले”; किशोरी पेडणेकर
पोलिसांनी मोबाईलवर फोन रेकॉर्डिंग अॅप ठेवायचा नाही असा पोलीस मॅन्युअलमध्ये नियम आहे का? असा सवाल सचिन सावंत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. त्याचबरोबर या प्रकाश टाकावा अन्यथा पोलिसांच्या सन्मानाचे रक्षण करावे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. तसेच लव्ह जिहाद नावाने खोटी बोंब ठोकून समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न अपराध नाही का ? मग कारवाई का नाही ? असा सवाल करीत नवनीत राणांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
“माझी खुर्ची, माझा परिवार या पलिकडे पेंग्विन सेनेला अस्तित्व नाही”; शेलारांची टिका
लव्ह जिहादच्या एका प्रकरणाबाबत खासदार नवनीत राणा यांचा पोलीस स्टेशनमधील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रकरणाबाबत नवनीत राणा यांनी पोलिस स्टेशनमध्येच पोलिसांची हुज्जत घातली. परंतु या प्रकरणात पीडित मुलगी स्वत; पळून गेल्याने या प्रकऱणाला वेगळचे वळण लागले.
“शिंदे गट धनुष्यबाणाला इतके का घाबरले? डरपोक गट” केदार दिघेंचा शिंदेंवर निशाणा
लव्ह जिहादच्या नावाखाली 19 वर्षीय मुलीचा अमरावती येथील रूक्मिणी नगर परिसरातून अपहरण गेल्याची तक्रार देण्यात आली. त्यानंतर नवनीत राणा आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस ठाण्यासमोर तणावाचे वातावरण निर्माण केले. याप्रकरणाची सविस्तर चौकशी केल्यानंतर पीडित मुलगी स्वत; पळून गेल्याने आणि तिच्यासोबत कुणी नसल्याचं पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी सांगितलं. त्यानंतर नवनीत राणांवर जोरदार टिका होत आहे.
सन्माननीय फडणवीस साहेब,
१. पोलिसांनी मोबाईलवर फोन रेकॉर्डिंग अॅप ठेवायचा नाही असा पोलिस मॅन्युअलमध्ये नियम आहे का? यावर प्रकाश टाकावा अन्यथा पोलिसांच्या सन्मानाचे रक्षण करावे.
२. लवजिहाद नावाने खोटी बोंब ठोकून समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न अपराध नाही का? मग कारवाई का नाही?— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 9, 2022
Read also
- “धर्म आणि अध्यात्म यामध्ये कोणीही राजकारण करू नये”; रोहित पवार
- “बारामतीत माझं काम बोलतं, माझ्यापेक्षा जास्त काम करणारा बारामतीत आणा..;”
- “थोडी लाज शिल्लक असेल तर जातीयवादी थयथयाटरागिणी पोलिसांची माफी माग”; रूपाली पाटलांचा राणांवर हल्लाबोल
- उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के..! साताऱ्यात युवासेनेचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश
- आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलेलो नाही, तर सामाजिक परिवर्तनासाठी हा पर्याय निवडला”; सुप्रिया सुळे