मुंबई : राज्यात आगामी महापालिका निवडणुकांसाठी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचं दिसून येत आहे. भाजप आणि शिंदे गट येणाऱ्या सर्व निवडणुका एकत्रित लढणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. यातच महाविकास आघाडी देखील सोबत लढणार असल्याचं संकेत वरिष्ठ नेत्यांनी दिलं आहे. यामध्ये मनसे देखील हातपाय हालवताना दिसत आहे.
“दाऊद टोळीचे माफिया हे राज्याचे वाजिरे आझम जनाब ‘घरंदाज उदौला”; भाजपचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
अलिकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी रांग लावली होती. देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यानंतर आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे मनसे आणि भाजपसोबत निवडणुका लढविणार का ? असा सवाल देखील याठिकाणी उपस्थित केला जात आहे.
यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मध्यंतरी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरे देखील मुख्यमंत्र्याचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर त्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यानंतर आज मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी देखील एकनाथ शिंदे यांची वर्षा याठिकाणी भेट घेतली. यावरून मनसे आणि शिंदे गटामध्ये नेमकं काय शिजतंय?असा सवाल लोकांना पडला आहे.
“धर्म आणि अध्यात्म यामध्ये कोणीही राजकारण करू नये”; रोहित पवार
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि धनुष्यबाणावरून राजकीय लढाई सुरू आहे. यामध्ये जर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निकाल लागला तर त्यांना एकतर दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल नाहीतर स्वत: चा पक्ष काढावा लागणार. त्यामुळे अशापण बातम्या समोर येत आहे की, एकनाथ शिंदे हे मनसे मध्ये विलीन होणार आणि आगामी निवडणुका सोबत लढणार. यावर राज ठाकरे यांनी देखील एका मुलाखतीत दुजोरा दिला आहे. भविष्यात जर शिंदे गट मनसेसोबत गेला तर उद्धव ठाकरे यांना याचा मोठा फटका बसू शकतो.
Read also
- “गेल्या निवडणुकीत चंद्रकांत दादा थोडक्यात जिंकले”, आता पार्सल कोथरूड ते कोल्हापुर जाणार
- “बारामतीने देशाला नाही पण पवार कुटुंबाला विकासाची दिशा दाखवली”
- “इथं आम्हाला पेटी बघायला मिळेना अन् विरोधक खोके दाखवताहेत”; शाहाजी पाटील
- आदित्य ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांनी लावला, मानाच्या पहिल्या गणपतीच्या पालखीला हात
- “चिप पल्बिसिटीबद्दल आपण कुप्रसिद्ध आहात हे विसरू नका”; नवनीत राणांवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल