पुणे : जशा जशा महापालिका, विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत. तशा राजकीय नेते एकमेकांवर चिखलफेक करण्यास सुरूवात केली आहे. बारामती लोकसभा मतदार संघावरून सध्या राज्यात एकच चर्चा रंगली आहे. तर अशातच आज राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी भाजपचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टिप्पणी केली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटलांना १ लाख ४ हजार मते मिळाली होती. तर मनसेचे उमेदवार अॅड. किशोर शिंदे यांनी अनपेक्षित लढत देऊन ८० हजार मते मिळविली होती. यावरूनच राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्या म्हणाल्या की, गेल्या निवडणुकीत चंद्रकांत दादा थोडक्यात जिंकले. यावेळी परमेश्वरही त्यांना वाचवू शकणार नाही. पार्सल कोथरूड ते कोल्हापुर असा हॅशटॅग देखील त्यांनी दिला आहे.
“धर्म आणि अध्यात्म यामध्ये कोणीही राजकारण करू नये”; रोहित पवार
स्थानिक विरूद्ध बाहेरचा म्हणून कोथरूड विधानसभा मतदार संघाची चर्चा रंगली होती. चंद्रकांत पाटील यांना भाजपने कोल्हापुर मधून न देता त्यांना पुण्यातून उमेदवारी देण्यात आली होती. भाजपच्या मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करून चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी स्थानिक भाजपचे नेते नाराज देखील झाले होते.
“बारामतीत माझं काम बोलतं, माझ्यापेक्षा जास्त काम करणारा बारामतीत आणा..;”
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांना १ लाख ९४१ मते मिळाली होती. तर शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत मोकोटे यांना ३६ हजार २७९ मते मिळाली होती. मात्र या निवडणुकीत ३५ हजार कमी मते मिळाली होती. त्यामुळे भाजपला मिळणारी कोथरूडमधील मत कमी कमी होत गेली आहे. यावरून आगामी निवडणुकीत भाजप कुणाला उमेदवारी देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- “बारामतीने देशाला नाही पण पवार कुटुंबाला विकासाची दिशा दाखवली”
- “इथं आम्हाला पेटी बघायला मिळेना अन् विरोधक खोके दाखवताहेत”; शाहाजी पाटील
- आदित्य ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांनी लावला, मानाच्या पहिल्या गणपतीच्या पालखीला हात
- “चिप पल्बिसिटीबद्दल आपण कुप्रसिद्ध आहात हे विसरू नका”; नवनीत राणांवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- “दाऊद टोळीचे माफिया हे राज्याचे वाजिरे आझम जनाब ‘घरंदाज उदौला”; भाजपचा उद्धव ठाकरेंवर निशाणा