मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबत याकुब मेमनचा भाऊ रऊफ यांच्या बैठकीचा व्हिडीओ व्हायरल केला. त्यानंतर या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली. यावर किशोरी पेडणेकरांनी भाजपला जशास तसं उत्तर दिलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण सध्या याकुब मेमनच्या कबरीवर चांगलचं तापलं आहे.
“ते दहीहंडी अन् गणेशोत्सवाच्या शुभेच्छा द्यायला देखील विसरले”; भाजपने ठाकरेंना पुन्हा डिवचलं
याकुब मेमनच्या कबरीचं सुभोभीकरण कऱण्यात आलं आहे. यावरून भाजपने किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर भाजपने पेडणेकरांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी राऊफ यांच्यासोबत राज्यपाल, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांचे फोटो ट्विट करत भाजपला जोराचा झटका दिला आहे. यावर आता कारवाई करणार का ? असा सवाल देखील पेडणेकरांनी भाजपला केला आहे.
शिंदे गट मनसेमध्ये विलीन होणार ? आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा
बारा तोंडं फक्त आरोप कऱण्यासाठी बसवली आहेत. एका मध्यमवर्गीय महिलेला तरी सोडा. मी कामाने मोठी झाले हो, मी नाही तुमच्यासारखे छक्के पंजे खेळले, माझ्या कामावर तुम्हाला आक्षेप असेल तर मला सांगा, पण हे काय घेऊन बसता, हे फोटो कोणीही काढतं. कोश्यारी किती होशियारी, माझ्यावर ऑब्जेक्शन घेता? एका स्त्रीवर ? राजकारणातील स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक म्हणून पण नाही का सोडणार ? सत्ता जरूर मिळवा, पण काम करून मिळवा, विश्वासार्हता जपून मिळवा, जी शिवसेना, बाळासाहेेबांनी मिळवली असं पेडणेकर म्हणाल्या.
“गेल्या निवडणुकीत चंद्रकांत दादा थोडक्यात जिंकले”, आता पार्सल कोथरूड ते कोल्हापुर जाणार
दरम्यान, राऊफ मेमनसोबत बडा कब्रस्तानमध्ये किशोरी पेडणेकरांची बैठक झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. या बैठकीचा एक व्हिडीओ भाजपने व्हायरल केला आहे. यामध्ये किशोेरी पेडणेकर राऊफ मेमनसोबत चर्चा करताना दिसत आहेत. त्याचसोबत या व्हिडीओमध्ये जवळपास 20 ते 25 लोक देखील असल्याचं दिसत आहेत. त्यामुळे सध्या या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं आहे.
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 10, 2022
Read also
- “सरकार, विरोधी पक्ष, याकडे राजकारणापलिकडे जाऊन बघा”; रोहित पवारांना चिंता
- “याकुब मेमनच्या भावाचा राज्यपालांसोबत फोटो”, काॅंग्रेसचा भाजपला सवाल
- “पितृपक्षात याकुब मेमन खाली येईल अन् याचे उत्तर देईल”; चित्रा वाघ यांचा पेडणेकरांवर हल्लाबोल
- “हजारो कोटींचा निधी बारामतीला ओरबडून घेतला, पण बाकी महाराष्ट्राचं काय ?”
- “आमच्यामध्ये हिंमत होती म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो”