नागपुर : काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काॅंग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सध्या रंगली आहे. अकोल्यात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावर आता नितीन गडकरी काय प्रतिक्रिया देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
“सरकार, विरोधी पक्ष, याकडे राजकारणापलिकडे जाऊन बघा”; रोहित पवारांना चिंता
नितीन गडकरींनी भाजपमध्ये घुसमट होत असल्याचं काॅंग्रेसमध्ये यावं. त्यांची आम्ही साथ देऊ, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरी पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. काॅंग्रेस हा लोकशाही व्यवस्था मानणारा पक्ष आहे. त्यामुळेच काॅंग्रेसमध्ये पक्षांतर्गगत निवडणुक घेतली जाते. देशात भाजपविरोधात बोलणाऱ्यांच्या मागे इडी, सीबीआय लावली जाते असा आरोप देखील त्यांनी भाजपवर केला.
“याकुब मेमनच्या भावाचा राज्यपालांसोबत फोटो”, काॅंग्रेसचा भाजपला सवाल
अलिकडेच भाजपने आपली केंद्रीय निवडणुक समिती आणि संसदीय मंडळाची समिती जाहीर केली. या दोन्ही समितीमध्ये नितीन गडकरी यांना वगळण्यात आले. त्यामुळे नितीन गडकरी हे भाजपवर नाराज असल्याचं बोलण्यात येत होतं. त्याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यावर आता भाजपचे नेते काय उत्तर देणार ते पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.
“पितृपक्षात याकुब मेमन खाली येईल अन् याचे उत्तर देईल”; चित्रा वाघ यांचा पेडणेकरांवर हल्लाबोल
दरम्यान, अमरावतीच्या प्रकरणाबाबत बोलताना ते म्हणाले की, कथित लव्ह जिहाद प्रकरणी पोलीस स्थानकात जाऊन आगपाखड करणाऱ्या नवनीत राणा यांचा ढोंगीपणाचा बुरखा त्या प्रकरणातील मुलीनेच फाडला आहे. प्रसिद्धीसाठी राणा या कोणत्या थराला जाऊ शकतात, याची कल्पना या प्रकरणातून अमरावतीसह महाराष्ट्रातील जनतेला आली आहे. निव्वळ प्रसिद्धीसाठी एखाद्या प्रकरणाला जातीचा, धर्माचा रंग देऊन राणा या समाजात द्वेष पसरवत आहेत. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला काळिमा फासण्याचे जे काम राणा करत आहेत ते त्यांनी वेळीच थांबवावे.
Read also
- “फडणवीस इस्लाम कबूल करत आहेत की रऊफला कुंभमेळ्याचे निमंत्रण देत आहेत ?”; सुषमा अंधारे
- “देवेंद्र फडणवीस खरे हिंदूचे नवे हिंदुह्दयसम्राट आहेत”; नितेश राणे
- “सत्तेची हवा डोक्यात गेली की अशी तोंडघशी पडायची वेळ येते”
- “विरोधकांना कोंडीत पकडणारे तोंडावर चांगलेच आपटले”; रूपाली पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
- पेडणेकरांचा भाजपच्या आरोपांच्या बॉलवर षटकार..! एका झटक्यात भाजपला केलं चारी मुंड्या चीत