मुंबई : याकुब मेमनच्या कबरीचं सुभोभीकरण कऱण्यात आलं आहे. यावरून भाजपने किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर भाजपने पेडणेकरांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी राऊफ यांच्यासोबत राज्यपाल, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांचे फोटो ट्विट करत भाजपला जोराचा झटका दिला आहे. यावर आता शिवसेनेच्या नेत्या सुषमा आंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.
“याकुब मेमनच्या भावाचा राज्यपालांसोबत फोटो”, काॅंग्रेसचा भाजपला सवाल
सुषमा आंधारे यांनी देवेंद्र फडणवीस आणि राऊफ मेमन यांचा फोटो ट्विट करीत बोचरी टिका केली आहे. त्या म्हणाल्या की, याकुब मेमनच्या कबरीवरून थयथयाट करणारी भाजप त्याच याकुबच्या चुलतभाऊ रौफ मेमन सोबत देवेंद्र फडणवीसांचा फोटो बघून गपगाप का पडलीय ? असा सवाल त्यांनी भाजपला केला आहे. तसेच फडणवीस इस्लाम कबूल करत आहेत की रऊफला कुंभमेळ्याचे निमंत्रण देत आहेत ? असा खोचक सवाल देखील त्यांनी केला आहे.
“पितृपक्षात याकुब मेमन खाली येईल अन् याचे उत्तर देईल”; चित्रा वाघ यांचा पेडणेकरांवर हल्लाबोल
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबत याकुब मेमनचा भाऊ रऊफ यांच्या बैठकीचा व्हिडीओ व्हायरल केला. त्यानंतर या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली. यावर किशोरी पेडणेकरांनी भाजपला जशास तसं उत्तर दिलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण सध्या याकुब मेमनच्या कबरीवर चांगलचं तापलं आहे.
“हजारो कोटींचा निधी बारामतीला ओरबडून घेतला, पण बाकी महाराष्ट्राचं काय ?”
राऊफ मेमनसोबत बडा कब्रस्तानमध्ये किशोरी पेडणेकरांची बैठक झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. या बैठकीचा एक व्हिडीओ भाजपने व्हायरल केला आहे. यामध्ये किशोेरी पेडणेकर राऊफ मेमनसोबत चर्चा करताना दिसत आहेत. त्याचसोबत या व्हिडीओमध्ये जवळपास 20 ते 25 लोक देखील असल्याचं दिसत आहेत. त्यामुळे सध्या या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं आहे.
याकूब मेमनच्या कबरीवरून थयथयाट करणारी भाजपा त्याच याकूबच्या चुलतभाऊ रौफ मेमन सोबत देवेंद्र फडणविसांचा फोटो बघून गपगार का पडलीय ?
फडणवीस इस्लाम कबूल करत आहेत की रऊफला कुंभमेळ्याचे निमंत्रण देत आहेत??@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra@ShivSena @OfficeofUT @AGSawant @AhirsachinAhir pic.twitter.com/s525jSAoqy— Andhare Sushama (@andharesushama) September 10, 2022
Read also
- “देवेंद्र फडणवीस खरे हिंदूचे नवे हिंदुह्दयसम्राट आहेत”; नितेश राणे
- “सत्तेची हवा डोक्यात गेली की अशी तोंडघशी पडायची वेळ येते”
- “विरोधकांना कोंडीत पकडणारे तोंडावर चांगलेच आपटले”; रूपाली पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
- पेडणेकरांचा भाजपच्या आरोपांच्या बॉलवर षटकार..! एका झटक्यात भाजपला केलं चारी मुंड्या चीत
- “सरकार, विरोधी पक्ष, याकडे राजकारणापलिकडे जाऊन बघा”; रोहित पवारांना चिंता