मुंबई : काॅंग्रेस हा लोकशाही व्यवस्था मानणारा पक्ष आहे. त्यामुळेच काॅंग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणूक घेतली जाते. जर नितीन गडकरी यांची भाजपमध्ये घुसमट होत असेल तर त्यांनी काॅंग्रेसमध्ये यावं अशी ऑफर काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नितीन गडकरींना दिली होती. त्यावर राज्यातील राजकीय नेत्यांनी पटोलेंवर निशाणा साधला.
“शिवसेनेनं जे अडीच वर्षात पेरलंय, ते आता उगवतंय”
काॅंग्रेसमध्ये नाना पटोले यांचीच स्थिती केविलवाणी आहे. पटोले यांना दिवसा स्वप्न पडतात. गडकरी साहेबांनी अनेकदा सांगितले की विहिरीत जीव देईन पण काॅंग्रेसमध्ये जाणार नाही. असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तर काही दिवसांनी नाना पटोलेच भाजपमध्ये येतील परंतु आम्ही त्यांना घेणार नाहीत. अशी प्रतिक्रिया भाजप नेते संजय कुटेे यांनी दिली आहे.
“उद्धव ठाकरे भविष्यात पंतप्रधान होतील, याच भीतीने भाजपने ‘शिवसेना’ फोडली”
नाना पटोले यांची नितीन गडकरींबद्दल बोलण्याची कुवत नाही. काही दिवसांनी नाना पटोले हेच भाजपमध्ये येतील. पण आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही. तो भाग वेगळा. नाना पटोले यांनी यापुर्वीच भाजप दर्शन घेतले आहे. ते सतत इकडून तिकडे आणि तिकडून इकडे करत असतात. त्यामुळे भविष्यात ते भाजपमध्ये येऊ शकतात. मात्र आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही असं कुटे म्हणाले.
Read also
- “फेसबुक लाईव्हवाला घरबशा पंतप्रधान लोकांच्या नशिबात नव्हता”
- “जयंत पाटील, त्यानंतर शरद पवारांचं भाषण झालं, पण तुमचं भाषण नाही”, अजित पवार म्हणाले,.
- “तेव्हा महाराष्ट्राचा अपमान झाल्याचा कांगावा कुणीतरी मोठ्या नेती ने केला होता”; चित्रा वाघ यांची सुळेंवर टिका
- “गर्दी जमवण्यासाठी सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर ही वेळ आली असेल तर..;” अन् अजित पवार संतापले
- “शरद पवार अन् अजित पवार एकाच नाण्याच्या दोन बाजू, त्यामुळे दानवसारखं बरळू नका”