पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचं अधिवेशन काल नवी दिल्लीतील एका स्टेडिअरवर पार पाडलं. मात्र यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात नाराजी नाट्यमय रंगल. अजित पवार यांच्या अगोदर जयंत पाटलांना भाषण करण्याची परवानगी दिली. त्यानंतर अजित पवार अचानक पणे निघून गेल्याने अनेकांना त्याचा धक्का बसला. यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला होता.
“आम्हाला असं वाटतं की आम्ही बारामती जिंकू”; चंद्रशेखर बावनकुळे
त्या म्हणाल्या की, देहू येथील शीळा स्मारक लोकार्पण सोहळ्यात अजित पवार बोलले नाहीत . अन् आता स्वत: च्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अजितदादांना बोलू दिलं गेलं नाही तर ती पक्षांतर्गबाब होते. आज कुणाचा आणि कुणी केलाय अपमान असं म्हणत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना डिवचलं आहे.
“अजित पवार नाराज नाही, ते लघूशंकेला गेले होते”; नाराजी नाट्यमयानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादीचे इतर नेत्यांची भाषणं सुरू असताना अजित पवारांच्या अगोदर जयंत पाटलांचं नाव भाषणासाठी पुकारण्यात आलं. जयंत पाटील भाषणासाठी उभे राहिले असता अजित पवार स्टेज सोडून बाहेर निघून गेले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे अजित पवारांना आणण्यासाठी बाहेर गेल्या. त्या अजित पवारांना घेऊन येताच इकडे शरद पवाराचं अध्यक्षीय भाषण सुरू झालं. त्यानंतर अजित पवाराचं भाषण राहून गेलं. यानंतर राज्यात अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात नाराजी असल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यावर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“भविष्यात देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे”
अजित पवार यांना भाषण न झाल्याच्या प्रकरणावर जंयत पाटील म्हणाले की, अजित पवार माझ्यावर अजिबात नाराज नाहीत. असं आहे की, कुणी लघूशंकेला गेलं तर त्याचीही बातमी करणं योग्य नाही. शरद पवारांच्या भाषणाला उपस्थित राहता यावं. म्हणून माझं भाषण सुरू असताना अजित पवार लघूशंकेला जाऊन आले अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली.
Read also
- “गर्दी जमवण्यासाठी सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर ही वेळ आली असेल तर..;” अन् अजित पवार संतापले
- “शरद पवार अन् अजित पवार एकाच नाण्याच्या दोन बाजू, त्यामुळे दानवसारखं बरळू नका”
- “शिवसेनेनं जे अडीच वर्षात पेरलंय, ते आता उगवतंय”
- “उद्धव ठाकरे भविष्यात पंतप्रधान होतील, याच भीतीने भाजपने ‘शिवसेना’ फोडली”
- “राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्याच नावावर चालतो”; अजित पवारांचं मोठं वक्तव्य