औरंगाबाद : संदीपान भुमरे यांच्या मागच्या सभेला केवळ 110 लोक होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाचा फ्लॉप शो होऊ नये म्हणून कदाचित ती काळजी घेतली असावी. परंतु मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन लोक जमवावी लागत असतील तर शिंदे गटातील भविष्य पुढे चांगलं नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.
“शरद पवार अन् अजित पवार एकाच नाण्याच्या दोन बाजू, त्यामुळे दानवसारखं बरळू नका”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज औरंगाबाद येथील पैठण येथे जाहीर सभा होत आहे. या सभेला राज्याचे मंत्री आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देखील उपस्थित आहेत. मात्र या सभेला अंगणवाडी सेविकांना जाहीर सभेत उपस्थित राहण्याचे आदेश दिल्याने एकच वाद निर्माण झाला आहे. यावर राज्याचे विरोधी पक्षांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टिका केली आहे.
“शिवसेनेनं जे अडीच वर्षात पेरलंय, ते आता उगवतंय”
७ सप्टेंबर २०२२ ला एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या औरंगाबादमधील अधिकाऱ्यांनी खुशाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या १२ सप्टेंबरच्या पैठण मतदारसंघातील सभेला प्रकल्पातील सर्व पर्यवेक्षिका, ४३ गावांमधील अगंणवाडी सेविका, मतदनीसांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनाही सुचना करण्यात आल्या आङेत. महाराष्ट्रात अशी पद्धत कधीच नव्हती असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
“उद्धव ठाकरे भविष्यात पंतप्रधान होतील, याच भीतीने भाजपने ‘शिवसेना’ फोडली”
एकनाथ शिंदेंची राजकीय सभा असेल तर अशाप्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांना बोलावण्याचं काहीच कारण नाही. महाराष्ट्रात हे पहिल्यांदा घडत आहे. अगंणवाडी सेविका, मदतनीस सभेला गेल्या तर तेथील मुलांनी काय करायंच, ते कुठे जाणार ? त्या मुलांकडे लक्ष कोण देणार ? गर्दी जमवण्यासाठी सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर ही वेळ आली असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
Read also
- “काही दिवसांनी पटोलेंच भाजपमध्ये येतील पण आम्ही त्यांना घेणार नाहीत”
- “फेसबुक लाईव्हवाला घरबशा पंतप्रधान लोकांच्या नशिबात नव्हता”
- “जयंत पाटील, त्यानंतर शरद पवारांचं भाषण झालं, पण तुमचं भाषण नाही”, अजित पवार म्हणाले,.
- “तेव्हा महाराष्ट्राचा अपमान झाल्याचा कांगावा कुणीतरी मोठ्या नेती ने केला होता”; चित्रा वाघ यांची सुळेंवर टिका
- “गर्दी जमवण्यासाठी सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर ही वेळ आली असेल तर..;” अन् अजित पवार संतापले