मुंबई : रघुनाथ कुचिक प्रकरणाला आता वेगळचं वळण लागलं आहे. पीडित मुलीनेच आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. बलात्काराची तक्रार दाखल करण्यासाठी चित्रा वाघ यांनीच माझ्यावर दबाव आणला असल्याचं पीडित मुलीने म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते मेहबुब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर टिका केली आहे. त्यावर आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
कोल्हापुर उत्तरमध्ये मतदान केंद्रावरच मोठा राडा! भाजप, काॅंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले
लाचखोरी रक्तात भिनलेल्या विचित्र लाचखोर महिला नेत्यांच्या कडून वेगळी अपेक्षा काय करणार ? महिलांच्या रक्षक म्हणून सांगणाऱ्या स्वत:च महिलांच्या भक्षक आहेत. ही गोष्ट गंभीर आहे. असल्या डबल ढोलकी व्यक्तीवर तात्काळ कारवाई करण्यात आली पाहिजे, असं मेहबुब शेख यांनी म्हटलं आहे. त्यावर चित्रा वाघ यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
“आघाडीला तोंड दाखवयाला जागा राहिली नाही”; जामीन अर्ज मंजूर झाल्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया
मेहबुब शेख यांच्या प्रतिक्रियेबाबत चित्रा वाघ यांना विचारलं असता त्या चांगल्याचं संतापल्या. त्या म्हणाल्या की, त्याला म्हणावं, तुझं चामडं सांभाळ. ते कुठल्याही क्षणी सोलण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे तु ते सांभाळ. हे गंभीर प्रकरण आहे. त्यात बलात्काऱ्यांनी चोमड्यासारखं बोलू नये. आम्ही त्यांच्या विरोधात बोलतोय. फेब्रुवारीपासून ती पोरगी लढतेय तेव्हा हे सगळे झोपले होते का? काय म्हणू याला भाई जान, आता त्याला तिची कड आलीय. जेव्हा माझ्या विरोधात बोलली. माझ्या नादाला लागण्याचं काम अजिबात करायचं नाही असा दम देखील चित्रा वाघ यांनी दिला.
प्रवीण दरेकर यांना न्यायालयाचा मोठा दिलासा! अटकपुर्व जामीन अर्ज मंजूर
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ही तरुणी बेपत्ता झाल्याची माहितीही समोर आली होती. त्यानंतरही चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या पीडित तरुणीसाठी आवाज उठवला होता. मात्र आता या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. सदरील पीडित तरुणीने आता थेट चित्रा वाघ यांच्यावरच त्यांनी दबाव आणला असा आरोप केला आहे. चित्रा वाघ यांनी मला खोटे नाटे आरोप करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला असं तरुणीने म्हटलं आहे. त्यामुळे आता त्या तरुणीला मदत केली म्हणून चित्रा वाघच अडचणीत येतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Read also:
- सोमय्या पिता-पुत्रांवर अटकेची टांगती तलवार; पुत्र नीलचाही जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
- सोमय्या पिता-पुत्रांवर अटकेची टांगती तलवार; पुत्र नीलचाही जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
- पीडित मुलीने आरोप केल्यानंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, मला आनंद वाटत आहे की..;
- कोल्हापुर पोटनिवडणुकीत रंगत; दुपारपर्यंत 99 हजार 732 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला
- पीडित तरूणीचे चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप; रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्ट