पुणे : पुण्यातील शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीने लग्नाचं आश्वासन देऊन बलात्कार आणि नंतर गर्भपात करायला लावल्याचा गंभीर आरोप मागील काही दिवसांपूर्वी केला होता. यानंतर भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याप्रकरणी आवाज उठवला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साद घालत या प्रकरणी कारवाई करा असं म्हटलं होतं.
पाणी रे पाणी, तेरा रंग कैसा? पालिकेच्या नवीन धोरणावरून शेलारांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं
गेल्या काही दिवसांपासून रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरण हे चांगलंच चिघळलेलं दिसतं होतं. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या वारंवार या प्रकरणात पीडित तरुणीच्या बाजूने संघर्ष करताना दिसत होत्या. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही याप्रकरणी कारवाईसाठी चित्रा वाघ यांनी वारंवार विनंती केली होती.
गुणरत्न सदावर्तेंनी एसटी कामगारांकडून पैसे गोळा केले; परिवहन मंत्र्यांचा धक्कादायक आरोप
काही दिवसांपूर्वी ही तरुणी बेपत्ता झाल्याची माहितीही समोर आली होती. त्यानंतरही चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या पीडित तरुणीसाठी आवाज उठवला होता. मात्र आता या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. सदरील पीडित तरुणीने आता थेट चित्रा वाघ यांच्यावरच त्यांनी दबाव आणला असा आरोप केला आहे.
ईडीची धमकी देणाऱ्या भाजपने कोल्हापूर निवडणुकीत वाटले पैसे ; विविध भागात ‘लक्ष्मी दर्शनाने’ खळबळ
चित्रा वाघ यांनी मला खोटे नाटे आरोप करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला असं तरुणीने म्हटलं आहे. त्यामुळे आता त्या तरुणीला मदत केली म्हणून चित्रा वाघच अडचणीत येतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे चित्रा वाघ यांनी देखील लगेचच आपली प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे की पीडित तरुणीला मदत मिळावी असा माझा हेतू होता. जर मी त्या तरुणीवर दबाव आणला असेल तर माझी चौकशी करावी. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास समर्थ आहे असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
Read also:
- पीडित तरूणीचे चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप; रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्ट
- कोल्हापुर उत्तरमध्ये मतदान केंद्रावरच मोठा राडा! भाजप, काॅंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले
- “आघाडीला तोंड दाखवयाला जागा राहिली नाही”; जामीन अर्ज मंजूर झाल्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया
- प्रवीण दरेकर यांना न्यायालयाचा मोठा दिलासा! अटकपुर्व जामीन अर्ज मंजूर
- करारा जवाब मिलेगा! ठाण्यातील राज ठाकरेंच्या सभेचं थेट काश्मीरमध्ये प्रेक्षपण