ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात उत्तर सभा पार पडणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेत राज्यात प्रचंड गदारोळ माजला होता. त्यामुळे या सभेत विरोधकांनासह सत्ताधारी तसेच संपुर्ण राजकीय नेत्यांना या सभेतुन उत्तर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच आता ठाण्यातील सभेतील थेट प्रेक्षपण जम्मू काश्मीरमध्ये देखील करण्यात येणार आहे. यासंबंधी काश्मीर पंडितांनी पोस्टर लावले आहेत.
भाजपच्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयात पैशाचा ढिग! कोल्हापुर पोटनिवडणुकसाठी पैशाचा वापर
राज ठाकरे यांनी मागील सभेत हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत मशिदीवरील भोंग्यांना विरोध दर्शविला होता. त्याचा परिणाम मनसेला भोगावा लागला. अनेक मनसेच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी यानंतर राजीनामे दिले. त्यामुळे आज सांयकाळी साडेसहा वाजता ठाण्यात सभा होत असून त्या सभेत सगळ्यांना उत्तर मिळण्याची शक्यता आहे.
“रूख हवाओं में बदला, तो खाक वो भी होंगे”; सोमय्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया
राज ठाकरे यांच्या सभेचं काश्मीर पंडितांनी पोस्टर लावले आहेत. त्या पोस्टरवर काश्मिर पंडितांच्या काश्मीर पंडित ग्रुप, हॉटेल रिजन्सी काटरा असं लिहिलं आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांचा मोठा फोटो देखील लावण्यात आला आहे. त्यावर हिंदुजननायक राजसाहब ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशी घोषणा लिहिली आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे काय बोलणार? त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
किरीट सोमय्यांना न्यायालयाचा मोठा दणका; जामीनपुर्व अर्ज न्यायालयाने फेटाळला
दरम्यान, मागील काही वर्षी राज ठाकरे यांनी भाजपविरोधात लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला होता. यावरून त्यांच्यावर मागील काही दिवसांत टीका करण्यात आली होती. मात्र आज होणाऱ्या सभेत लाव रे तो व्हिडीओ पार्ट टू चा धमाका करणार असल्याचं बोललं जात आहे. या सभेत काही व्हिडीओ देखील दाखवले जाण्याची शक्यता आहे.
Read also:
- पाणी रे पाणी, तेरा रंग कैसा? पालिकेच्या नवीन धोरणावरून शेलारांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं
- एकही कागद, तक्रार नाही, नुसते हवेतील आरोप; जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया
- गुणरत्न सदावर्तेंनी एसटी कामगारांकडून पैसे गोळा केले; परिवहन मंत्र्यांचा धक्कादायक आरोप
- ईडीची धमकी देणाऱ्या भाजपने कोल्हापूर निवडणुकीत वाटले पैसे ; विविध भागात ‘लक्ष्मी दर्शनाने’ खळबळ
- किती दिवस पवारांची भांडी घासणार? निलेश राणेंचा अनिल परबांना सवाल