कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात आता प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता ‘लक्ष्मी दर्शनाच्या’ प्रकाराला सुरुवात झाली असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी खुली लढत कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी होणार आहे. शेवटच्या दोन दिवसांत आचारसंहिता असतानाही दोन्ही पक्षांनी ताकद मोठ्या प्रमाणावर लावली आहे.
सदावर्तेंनी कर्मचाऱ्यांच्या मनात विष कालवलं, त्यामुळे अनेकांनी जीवन संपवलं; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
कसबा बावडा, शिवाजीपेठ भागात कोल्हापूरचे पालकमंत्री बंटी पाटील यांची मोठी ताकद असल्याने हा भाग फोडण्यासाठी कालच्या दिवसात भाजपकडून नागरिकांना चांगलेच ‘लक्ष्मी दर्शन’ करण्यात आले असं देखील चित्र समोर आलं आहे. भाजपकडून मागच्या काळात थेट मतदारांनाही ईडीची धमकी देण्यात आली होती. मात्र काल भाजपच्या कार्यकर्त्यानांच पैसे वाटप करताना पोलिसांनी पकडल्याने खळबळ माजली आहे. मंगळवार पेठ भाग, दसरा चौक या भागात पोलीस प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा विभागाने छापा मारून भाजपच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडे रोख रक्कम आणि मतदारांच्या नावाची यादी सापडली आहे.
“सदावर्ते काॅलेजला सलग 4 वेळा नापास”; वैद्यकीय महाविद्यालयाने लावला होता ‘Debar rule’
ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांची रात्री उशिरा पर्यंत चौकशी सुरु होती. या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आलेली आहे. एवढंच नाही तर एका भाजपच्या नगरसेवकाच्या कार्यालयातीही पैशांचे बंडल सापडले आहेत. सदरील नगरसेवक देखील भाजपचाच असल्याने आता ईडीची धमकी देणाऱ्या भाजपला हे काय झालं ? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
राज ठाकरे बाळासाहेबांचे पुतणे, वारसदार नाहीत; रामदास आठवलेंचं वक्तव्य
पालकमंत्री बंटी पाटील यांची प्रतिष्ठा कोल्हापूर उत्तरेच्या पोटनिवडणुकीत पणाला लागली आहे. या निवडणुकीच्या विजय, पराजयावर त्यांचे नेतृत्व ठरणार असल्याचेही बोलले जात आहे. आता कोल्हापूर उत्तरचे मैदान कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Read also:
- किती दिवस पवारांची भांडी घासणार? निलेश राणेंचा अनिल परबांना सवाल
- भाजपच्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयात पैशाचा ढिग! कोल्हापुर पोटनिवडणुकसाठी पैशाचा वापर
- “रूख हवाओं में बदला, तो खाक वो भी होंगे”; सोमय्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया
- किरीट सोमय्यांना न्यायालयाचा मोठा दणका; जामीनपुर्व अर्ज न्यायालयाने फेटाळला
- गुणरत्ने सदावर्तेंचा कोठडीतील मुक्काम वाढला; न्यायालयाने 13 एप्रिलपर्यंत दिली पोलीस कोठडी