मुंबई : राज्यात एसटी आंदोलनाचा मुद्या गेल्या पाच महिन्यांपासून सुरू आहे. काल अचानक एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर दगडफेक करत हल्ला केला. त्यानंतर त्याठिकाणी वातावरण जोरदार चिघळलं होतं. यावरून राज्यातील अनेक नेत्यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर कडाडून टिका केली आहे.
“सदावर्ते काॅलेजला सलग 4 वेळा नापास”; वैद्यकीय महाविद्यालयाने लावला होता ‘Debar rule’
नितेश राणे म्हणाले की, हे 109 कामगार मराठी नाही?? कुठेही पवारांच्या घराचं नुकसान झालेलं नाही मग ही शिक्षा कशासाठी?? किती दिवस पवारांची भांडी घासणार, भानगडी सोडल्या तर काय मिळालं पवारांमुळे महाराष्ट्राला याचा कधी तरी विचार करा आणि ते 109 कामगार कुठे जातील याचाही विचार करा, असं त्यात त्यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे बाळासाहेबांचे पुतणे, वारसदार नाहीत; रामदास आठवलेंचं वक्तव्य
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ल्या केल्याप्रकरणी 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अॅड गुणरत्ने सदावर्ते यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर त्या 109 जणांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
“सोमय्या पळणारा नेता नाही, पळवणारा नेता आहे”; प्रवीण दरेकांचा आघाडीवर निशाणा
दरम्यान, काल घडलेल्या प्रकरामुळे शरद पवार यांच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील शरद पवार यांच्या घरी जाऊन चौकशी केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात बैठक पार पडली. त्या बैठकीत मुंबई पोलीस संजय पांडे हे देखील उपस्थित होते.
Read also:
- भाजपच्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयात पैशाचा ढिग! कोल्हापुर पोटनिवडणुकसाठी पैशाचा वापर
- “रूख हवाओं में बदला, तो खाक वो भी होंगे”; सोमय्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया
- किरीट सोमय्यांना न्यायालयाचा मोठा दणका; जामीनपुर्व अर्ज न्यायालयाने फेटाळला
- गुणरत्ने सदावर्तेंचा कोठडीतील मुक्काम वाढला; न्यायालयाने 13 एप्रिलपर्यंत दिली पोलीस कोठडी
- सदावर्तेंनी कर्मचाऱ्यांच्या मनात विष कालवलं, त्यामुळे अनेकांनी जीवन संपवलं; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप