मुंबई : पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर शेवट झाला. मात्र त्यानंतर राज्यात आणि राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणाऱ्या गोष्टी घडून आल्या. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी निकालानंतर गुलाल उधळला आणि दुसऱ्या दिवशी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर आंदोलन नेले.
गुणरत्ने सदावर्तेंचा कोठडीतील मुक्काम वाढला; न्यायालयाने 13 एप्रिलपर्यंत दिली पोलीस कोठडी
हे आंदोलन इतके चिघळले की थेट शरद पवारांच्या घरावर चप्पलफेक करण्यात आली. या चप्पलफेकी मागे आणि झालेल्या राड्यामागे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांचा हात असल्याचं समजत आहे. यासंदर्भात आता परिवहनमंत्री अनिल परब यांनी महत्वाचे वक्तव्य केलं आहे.
सदावर्तेंनी कर्मचाऱ्यांच्या मनात विष कालवलं, त्यामुळे अनेकांनी जीवन संपवलं; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
एसटी कर्मचाऱ्यांना भडकवल्यामुळे त्यांचे आंदोलन चिघळले आणि त्यांनी शरद पवार यांच्या घरावर हल्ला चढवला. या हल्ल्यामागे गुणरत्न सदावर्ते हेच मुख्य सूत्रधार आहेत अशी बाजू सरकारी पक्षाने न्यायालयात मांडली आहे. मी तुम्हाला विलगीकरण मिळवून देईलच असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी कामगारांकडून पैसे गोळा केले.
“सदावर्ते काॅलेजला सलग 4 वेळा नापास”; वैद्यकीय महाविद्यालयाने लावला होता ‘Debar rule’
या गोळा केलेल्या पैशाचा वापर सदावर्ते यांनी कशासाठी केला, हल्ला घडवून आणण्यासाठी याचा वापर झाला काय, याचाही तपास पोलिस करणार आहेत असं परिवहनमंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे. एसटी पुन्हा सुरू करण्यासाठी करायच्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली यामध्ये अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याबाबत काय निर्णय घ्यायाचा याविषयीही बैठकीत निर्णय झाला आहे.ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी पवार साहेबांच्या घरावर हल्ला केला तसेच गंभीर गुन्ह्यात कर्मचाऱ्यांचा सहभाग असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं देखील अनिल परबांनी म्हटलं आहे.
Read also:
- ईडीची धमकी देणाऱ्या भाजपने कोल्हापूर निवडणुकीत वाटले पैसे ; विविध भागात ‘लक्ष्मी दर्शनाने’ खळबळ
- किती दिवस पवारांची भांडी घासणार? निलेश राणेंचा अनिल परबांना सवाल
- भाजपच्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयात पैशाचा ढिग! कोल्हापुर पोटनिवडणुकसाठी पैशाचा वापर
- “रूख हवाओं में बदला, तो खाक वो भी होंगे”; सोमय्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया
- किरीट सोमय्यांना न्यायालयाचा मोठा दणका; जामीनपुर्व अर्ज न्यायालयाने फेटाळला