मुंबई : आयएऩएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्या हे चौकशीला उपस्थित न राहता अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून कोर्टाकडे मागणी केली होती. आज त्यावर सुनावणी झाली आणि किरीट सोमय्या यांना धक्का बसला आहे. आयएनएस विक्रांत बचाव मोहीम अंतर्गत झालेल्या आर्थिक व्यवहारांबाबतच्या सुनावणीत किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
किरीट सोमय्यांना न्यायालयाचा मोठा दणका; जामीनपुर्व अर्ज न्यायालयाने फेटाळला
गेल्या काही दिवसापासून किरीट सोमय्या नॉट रिचेबल होते.पत्नीच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी देखील ते उपस्थित नव्हते. त्यानंतर त्यांचा फोनही लागत नव्हता. त्यातच भाजपच्या एकही नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया न दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं होतं. आज अचानक त्यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून न्यायालयाने जामीनपुर्व अर्ज फेटाळल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
गुणरत्ने सदावर्तेंचा कोठडीतील मुक्काम वाढला; न्यायालयाने 13 एप्रिलपर्यंत दिली पोलीस कोठडी
किरीट सोमय्या म्हणाले की, मी या प्रकरणी उच्च न्यायालयात जाणार असून त्याठिकाणी माझी बाजू मांडणार आहे. या घोटाळ्याचा दावा केला जात आहे. पंरतु त्यांच्याकडे एकही कागद, तक्रार कुणीच दिली नाही. नुसते हवेतील आरोप केले आहेत. या संपुर्ण गोष्टी न्यायालयात मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच ठाकरे सरकारमधील घोटाळेबाजांना धडा शिकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
सदावर्तेंनी कर्मचाऱ्यांच्या मनात विष कालवलं, त्यामुळे अनेकांनी जीवन संपवलं; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत प्रकरणाबाबत किरीट सोमय्यांवर आरोप केले होते. त्यानंतर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला. त्यानंतर त्यांनी मुंबई येथील उच्च न्यायालयात जामीनपुर्व अर्ज सादर केला होता. पंरतु तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यातच आता किरीट सोमय्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also:
- गुणरत्न सदावर्तेंनी एसटी कामगारांकडून पैसे गोळा केले; परिवहन मंत्र्यांचा धक्कादायक आरोप
- ईडीची धमकी देणाऱ्या भाजपने कोल्हापूर निवडणुकीत वाटले पैसे ; विविध भागात ‘लक्ष्मी दर्शनाने’ खळबळ
- किती दिवस पवारांची भांडी घासणार? निलेश राणेंचा अनिल परबांना सवाल
- भाजपच्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयात पैशाचा ढिग! कोल्हापुर पोटनिवडणुकसाठी पैशाचा वापर
- “रूख हवाओं में बदला, तो खाक वो भी होंगे”; सोमय्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया