मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई पालिका मुख्यालयात महत्वपुर्ण घोषणा केली. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेने पाणीपुरवठ्याबाबत नवीन धोरण आखलं आहे. त्यांची माहिती सांगितली. यानुसार अधिकृत झोपडीधारक, खासगी जमिनीवरील अघोषित झोपडीधारक, तटीय नियमन क्षेत्रात वास्तव्यास असलेले, सरकारी जमिनींवरील झोपडीधारक आदिंना मानतावादी दृष्टीकोनातुुन पाणी पुरवठ्याला देण्यात येणार आहे. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.
“रूख हवाओं में बदला, तो खाक वो भी होंगे”; सोमय्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया
आशिष शेलार यांनी त्याबाबत ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, मुंबईतील सर्व झोपडपट्यांना पाणी द्यायला हवे याबाबत न्यायालयाने चर्चा केली होती. त्यामुळे आता सर्वांना पालकमंत्री पाणी देणार हा मुद्दा नवीन नाही. बंर सर्वांना देणार म्हणता, मग मुंबईतली कोळीवाडे, गावठाणांचा उल्लेख का नाही? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. तसेच आमच्या या मुळे मुंबईकरांवर राग आहे का? असा प्रश्न देखील आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना विचारला आहे.
किरीट सोमय्यांना न्यायालयाचा मोठा दणका; जामीनपुर्व अर्ज न्यायालयाने फेटाळला
बंर आता निवडणुका जवळ आल्यावर तुम्हाला मुंबईचे पाणी कसं आठवलं? त्यामुळे कुच तो गडबड है…! पाणी कुठेतरी मुरतेय? बहुतेक समुद्राचे पाणी गोडे करण्याचे कंत्राट द्यायचे आहे, म्हणुन तर पाण्याची गरज निर्माण केली जात नाही ना? पाणी रे पाणी तेरा रंग कैसा?असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
गुणरत्ने सदावर्तेंचा कोठडीतील मुक्काम वाढला; न्यायालयाने 13 एप्रिलपर्यंत दिली पोलीस कोठडी
दरम्यान, आगामी काही महिन्यांत मुंबई महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या हेतुने सध्या राजकीय पक्ष विविध विकास कामे करीत आहे. मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक या प्रमुख शहरांत देखील नि़वडणुका होत आहे. त्यामुळे या निवडणुका रंगतदार होण्याची शक्यता आहे.
Read also:
- एकही कागद, तक्रार नाही, नुसते हवेतील आरोप; जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया
- गुणरत्न सदावर्तेंनी एसटी कामगारांकडून पैसे गोळा केले; परिवहन मंत्र्यांचा धक्कादायक आरोप
- ईडीची धमकी देणाऱ्या भाजपने कोल्हापूर निवडणुकीत वाटले पैसे ; विविध भागात ‘लक्ष्मी दर्शनाने’ खळबळ
- किती दिवस पवारांची भांडी घासणार? निलेश राणेंचा अनिल परबांना सवाल
- भाजपच्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयात पैशाचा ढिग! कोल्हापुर पोटनिवडणुकसाठी पैशाचा वापर