कोल्हापूर : उत्तर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यावेळी कोल्हापुरमधील राजकीय नेत्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजपकडून सत्यजित कदम तर काॅंग्रेस आणि महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र आज मतदान केंद्रावरच भाजप आणि काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे.
गुणरत्न सदावर्तेंनी एसटी कामगारांकडून पैसे गोळा केले; परिवहन मंत्र्यांचा धक्कादायक आरोप
कोल्हापुर उत्तरेसाठी आज भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. आज कोल्हापुरमधील विविध मतदान केंद्रावर मतदान करण्यात आलं. मात्र यावेळी कोल्हापुर उत्तर मतदान केंद्रावर भाजप आणि काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावेळी काही मिनिटे तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी योग्यवेळी हस्तक्षेप केल्याने तणाव मिटला.
ईडीची धमकी देणाऱ्या भाजपने कोल्हापूर निवडणुकीत वाटले पैसे ; विविध भागात ‘लक्ष्मी दर्शनाने’ खळबळ
अशातच काल कोल्हापूर उत्तर मतदारसंघात आता प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता ‘लक्ष्मी दर्शनाच्या’ प्रकाराला सुरुवात झाली असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी खुली लढत कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी होणार आहे. शेवटच्या दोन दिवसांत आचारसंहिता असतानाही दोन्ही पक्षांनी ताकद मोठ्या प्रमाणावर लावली आहे.
किती दिवस पवारांची भांडी घासणार? निलेश राणेंचा अनिल परबांना सवाल
कसबा बावडा, शिवाजीपेठ भागात कोल्हापूरचे पालकमंत्री बंटी पाटील यांची मोठी ताकद असल्याने हा भाग फोडण्यासाठी कालच्या दिवसात भाजपकडून नागरिकांना चांगलेच ‘लक्ष्मी दर्शन’ करण्यात आले असं देखील चित्र समोर आलं आहे. भाजपकडून मागच्या काळात थेट मतदारांनाही ईडीची धमकी देण्यात आली होती. मात्र काल भाजपच्या कार्यकर्त्यानांच पैसे वाटप करताना पोलिसांनी पकडल्याने खळबळ माजली आहे. मंगळवार पेठ भाग, दसरा चौक या भागात पोलीस प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा विभागाने छापा मारून भाजपच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडे रोख रक्कम आणि मतदारांच्या नावाची यादी सापडली आहे.
Read also:
- “आघाडीला तोंड दाखवयाला जागा राहिली नाही”; जामीन अर्ज मंजूर झाल्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया
- प्रवीण दरेकर यांना न्यायालयाचा मोठा दिलासा! अटकपुर्व जामीन अर्ज मंजूर
- करारा जवाब मिलेगा! ठाण्यातील राज ठाकरेंच्या सभेचं थेट काश्मीरमध्ये प्रेक्षपण
- पाणी रे पाणी, तेरा रंग कैसा? पालिकेच्या नवीन धोरणावरून शेलारांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं
- एकही कागद, तक्रार नाही, नुसते हवेतील आरोप; जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया