मुंबई : भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबै बॅंक निवडणुक प्रकरणी त्यांनी उच्च न्यायलायात अटकपुर्व जामीन अर्ज सादर केला होता. त्यावर आज सुनावणी होऊन त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
किती दिवस पवारांची भांडी घासणार? निलेश राणेंचा अनिल परबांना सवाल
प्रवीण दरेकर म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारकडून मला मुद्दाम त्रास दिला जात आहे. मात्र कुणाला काय वाटलं तरी मनमानी करता येत नाही. पहिल्यांपासून पोलीस मुद्दाम त्रास देत होते. तसेच त्यांच्या विरोधात बोलत असल्याने माझा तोंड दाबण्याचा प्रयत्न केला होता. मला पोलिसांनी चौकशीसाठी जेव्हा जेव्हा बोलवलं तेव्हा मी हजर झालो. चौकशीसाठी मी पोलिसांना सहकार्य केलं. त्यामुळेच मला न्यायदेवतेने दिलासा दिला असल्याचं त्यांनी सांगितलं.
भाजपच्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयात पैशाचा ढिग! कोल्हापुर पोटनिवडणुकसाठी पैशाचा वापर
जामीन अर्ज मंजूर झाल्यानंतर सरकारला आता तोंडावर आपटण्याची सवय झाली आहे. यांना आता तोंड दाखवला जागा उरलेली नाही. लोकांचे शिव्याशाप घ्यायची सवय झाली आहे. पोलिसांशी हाताशी केसेस तयार करीत आहेत. आम्हाला दिलासे मिळतील आणि परंतु हे जेलमध्ये जातील एव्हढं निश्चित मी सांगतो. खरं तर या सरकारला माज आला आहे. आतातरी त्यांनी डोळे उघडावे. असा टोला देखील त्यांनी लगावला.
दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी मुंबै बॅंक निवडणुक ही बोगस मजूर म्हणून लढवली होती. त्यावरून त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांपासून प्रवीण दरेकर यांच्यावर अटक होण्याची घंटा वाजत होती. मात्र आज न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर करून प्रवीण दरेकर यांना मोठा दिलासा मिळला आहे.
Read also:
- करारा जवाब मिलेगा! ठाण्यातील राज ठाकरेंच्या सभेचं थेट काश्मीरमध्ये प्रेक्षपण
- पाणी रे पाणी, तेरा रंग कैसा? पालिकेच्या नवीन धोरणावरून शेलारांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं
- एकही कागद, तक्रार नाही, नुसते हवेतील आरोप; जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया
- गुणरत्न सदावर्तेंनी एसटी कामगारांकडून पैसे गोळा केले; परिवहन मंत्र्यांचा धक्कादायक आरोप
- ईडीची धमकी देणाऱ्या भाजपने कोल्हापूर निवडणुकीत वाटले पैसे ; विविध भागात ‘लक्ष्मी दर्शनाने’ खळबळ