मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार आणि या सरकारमधील वजनदार मंत्र्यांना अडचणीत आण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, शिवसेनेचे इतर काही नेते यांच्याविरोधात किरीट सोमय्या यांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेतली होती.
प्रवीण दरेकर यांना न्यायालयाचा मोठा दिलासा! अटकपुर्व जामीन अर्ज मंजूर
महाविकास आघाडीच्या विरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे किरीट सोमय्या हे स्वतःच आता अडचणीत आले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेत पैसे खाल्ल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी ट्रॉमबे पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या, निल सोमय्या यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
करारा जवाब मिलेगा! ठाण्यातील राज ठाकरेंच्या सभेचं थेट काश्मीरमध्ये प्रेक्षपण
काल किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज केला होता. मात्र किरीट सोमय्या यांची ही मागणी सत्र न्यायालायने फेटाळून लावली होती. किरीट सोमय्या हे बाहेर देशात पळून जाणार आहेत असा आरोपही यानंतर संजय राऊत यांनी केला होता. आज मात्र ट्विटरवर सोमय्या यांनी व्हिडिओ टाकत याबाबत स्पष्टीकरण दिले होते.
ईडीची धमकी देणाऱ्या भाजपने कोल्हापूर निवडणुकीत वाटले पैसे ; विविध भागात ‘लक्ष्मी दर्शनाने’ खळबळ
दुसरीकडे आज किरीट सोमय्या यांचे पुत्र निल सोमैय्या यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली, यामध्ये सोमय्या पिता-पुत्रांना जबर धक्का बसला आहे. निल सोमय्या यांचाही जामीन सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यामुळे किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अटकेची टांगती तलवार आता सोमय्या पिता पुत्रांच्या भोवती लागली आहे. आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी जमा झालेले ५८ कोटी रुपये सोमय्यांनी हडप केल्याचा आरोप राऊत यांनी राज्यपाल कार्यालयातील पत्राचा हवाला देत केला होता. त्यानंतर माजी सैनिक भोसले यांनी सोमय्या यांच्याविरोधात तक्रार दिली होती.
Read also:
- पीडित मुलीने आरोप केल्यानंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, मला आनंद वाटत आहे की..;
- कोल्हापुर पोटनिवडणुकीत रंगत; दुपारपर्यंत 99 हजार 732 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला
- पीडित तरूणीचे चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप; रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्ट
- कोल्हापुर उत्तरमध्ये मतदान केंद्रावरच मोठा राडा! भाजप, काॅंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले
- “आघाडीला तोंड दाखवयाला जागा राहिली नाही”; जामीन अर्ज मंजूर झाल्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया