कोल्हापूर : उत्तर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यावेळी कोल्हापुरमधील राजकीय नेत्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजपकडून सत्यजित कदम तर काॅंग्रेस आणि महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र आज मतदान केंद्रावरच भाजप आणि काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला तर दुपारी एकपर्यंत सरासरी 34.18 टक्के मतदान झालं आहे.
ईडीची धमकी देणाऱ्या भाजपने कोल्हापूर निवडणुकीत वाटले पैसे ; विविध भागात ‘लक्ष्मी दर्शनाने’ खळबळ
कोल्हापुर उत्तर पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते कोल्हापुरात ठाण मांडून बसले होते. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत बघायला मिळणार आहे. आज कोल्हापुराच्या मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे. दुपारी एक पर्यंत सरासरी 34.18 टक्के मतदानाचा हक्क बजावण्यात आला. तर एकुण 99 हजार 732 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
गुणरत्न सदावर्तेंनी एसटी कामगारांकडून पैसे गोळा केले; परिवहन मंत्र्यांचा धक्कादायक आरोप
भाजपकडून सत्यजित कदम तर महाविकास आघाडी आणि काॅंग्रेसकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुपार पर्यंत 54 हजार 363 तर 45 हजार 368 महिला मतददारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या पोटनिवडणुकीचा निकाल येत्या 16 एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
पाणी रे पाणी, तेरा रंग कैसा? पालिकेच्या नवीन धोरणावरून शेलारांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं
दरम्यान, करूणा मुंडे यांनी देखील या पोटनिवडणुकीत अर्ज दाखल केला होता. त्यासोबत 15 उमेदवार या पोटनिवडणुकीत मैदानात उतरले आहे. त्यांचं आज भविष्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे.
Read also:
- पीडित तरूणीचे चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप; रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्ट
- कोल्हापुर उत्तरमध्ये मतदान केंद्रावरच मोठा राडा! भाजप, काॅंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले
- “आघाडीला तोंड दाखवयाला जागा राहिली नाही”; जामीन अर्ज मंजूर झाल्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया
- प्रवीण दरेकर यांना न्यायालयाचा मोठा दिलासा! अटकपुर्व जामीन अर्ज मंजूर
- करारा जवाब मिलेगा! ठाण्यातील राज ठाकरेंच्या सभेचं थेट काश्मीरमध्ये प्रेक्षपण