मुंबई : राज्यातील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय नांदेड येथे ४८ तासात ३१ जणांचा मृत्यू झाला. संभाजीनगर येथील रूग्णालयात २४ तासांत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्था ही व्हेंटीलेटरवर असून शासनाच्या अनास्थेमुळे ही परिस्थिती उद्धवली आहे. याची उच्च न्यायालयाने देखील दखल घेतली आहे. त्यामुळे सरकारचं हे एकप्रकारे अपयश आहे. यामुळे वैद्यकीय मंत्री आणि आरोग्य मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली. आज काॅंग्रेसच्या शिष्टमंडळांनी राज्यपालांची भेट घेतली.
हेही वाचा…“भाजप मित्र म्हणून जवळ घेतो आणि अफजल खानासारखी मिठी मारतो”, मित्र पक्षाचा गंभीर आरोप
रूग्णालयात होत असलेले मृत्यू, कंत्राटी भरती, जालना येथे मराठा आरक्षणासंदर्भात कारवाई, लोकप्रतिनिधी यांचे अधिकाऱ्यांना दमदाटी करण्याचे प्रकार या घटना विजय वडेट्टीवारांनी राज्यपालांच्या निर्दशास आणून दिल्या. तसे महिलांवरील बलात्कार, विनयभंग, छेडछाड असे प्रकार वाढले असून महिलांच्या अपहरणाच्या गुन्हांमध्ये २२ टक्क्यांने वाढ झाली असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा… रोहित पवारांच्या ‘युवा संघर्ष यात्रे’ने सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणणार, १३ जिल्ह्यातून जाणारी यात्रा भाजपच्या महाविजय २०२४ ला खिंडार पाडत जाणार
दरम्यान, राज्यातील बिमार शासकीय आरोग्यव्यवस्था, कंत्राटी नोकर भरतीमुळे राज्यातील तरुणांचे उध्वस्त होणारे भविष्य व राज्य सरकारचा आरक्षण संपवण्याचा असलेला घाट, दुष्काळी परिस्थिती, महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत २२ टक्क्यांनी झालेली वाढ या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी महामहीम राज्यपालांकडे विधानसभेचे विशेष सत्र बोलावण्याची मागणी केली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षाताई गायकवाड व काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार, ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभेचे विशेष सत्र बोलवण्याची मागणी आज काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने महामहीम राज्यपालांकडे केली आहे.@maha_governor @NANA_PATOLE @INCIndia @INCMaharashtra @sachin_inc @BhaiJagtap1 @AshokChavanINC @bb_thorat pic.twitter.com/3TbNes0pam
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 5, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“निकाल काही असो, चिंता करण्याची काही गरज नाही”, निकालाआधी शरद पवारांनी शड्डू ठोकला
हेही वाचा…गावभर होर्डिंग्ज लावणं भोवलं, पुनीत बालन यांना पालिकेचा दणका,सन्मानार्थ मंडळाचे कार्यकर्ते एकवटले
हेही वाचा…शिंदे सरकारला हायकोर्टाचा मोठा दणका, आघाडी सरकारचा कोर्टात ‘तो’ मोठा विजय
हेही वाचा…“पुण्यात माजी नगरसेविकेवर बलात्कार, दोषी नराधमांवर कठोर कारवाई करा,” राष्ट्रवादीची मागणी
हेही वाचा…“आधी महत्वाची खाती काढली अन् आता पुण्याचं पालकमंत्री, चंद्रकांत दादांचं डीमोशन बघवत नाही हो ,”