नवी दिल्ली : राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हाबाबत उद्या निवडणुक आयोगात सुनावणी होणार आहे. त्याआधी शरद पवारांनी दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवली होती. या बैठकीत शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल करत अजित पवार गटावरही निशाणा साधला आहे. काही लोक सोडून गेलेत त्यानं काय आधार आहे. पण चिंता करण्याची काही गरज नाही. असं म्हणत शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विश्वास दिला आहे.
हेही वाचा… रोहित पवारांच्या ‘युवा संघर्ष यात्रे’ने सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणणार, १३ जिल्ह्यातून जाणारी यात्रा भाजपच्या महाविजय २०२४ ला खिंडार पाडत जाणार
शरद पवारांनी अजित पवार गटांवर जोरदार घणाघात केला. इडीची कारवाई होईल असा दबाव टाकल्यानंतर काही जण सत्तेत गेले आहेत. मात्र इमानदार कार्यकर्त्यांनी, अनिल देशमुखांनी पक्ष सोडला नाही. यामध्ये राष्ट्रवादीच्या सात जणांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेतलं. लोक सोडून गेलेत त्यानं काय आधार आहे. असा सवाल करत कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. असंही शरद पवारांनी सांगितले.
हेही वाचा…“५६ वर्षात शरद पवार एकही निवडणुक हरले नाहीत, ” सुप्रिया सुळेंनी सांगितलं रहस्य, म्हणाल्या..,
याअगोदर काॅंग्रेसचे चिन्ह बदलण्यात आलं होतं. काॅंग्रेसचे दोन भाग झाले होते. काॅंग्रेस आय आणि काॅंग्रेस ओ. निवडणूक चिन्ह हा महत्वाचा आधार आहे. चिन्ह गेलं तरी लोक बदलत नाहीत. पहिली निवडणूक मी उमेदवार होतो. बैलजोडी या चिन्हावर निवडणुक लढलो आणि निवडून देखील आलो होतो. आयोगाचा निर्णय आपल्याच बाजून लागेल. निकाल काही असो, चिंतेचं कारण नाही. देशातील वातावरण बदलत आहे. असा विश्वास देखील शरद पवारांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा…आली समीप घटिका..! एकनाथ शिंदें दिल्लीला तात्काळ रवाना
दरम्यान, अनेक राज्यात भाजपचे सरकार नाही आहे. दिल्ली, पंजाब, ओडीसामध्ये भाजप सत्तेत नाही. यातच माझी निवड योग्य नाही म्हणता पण माझ्या अध्यक्षपदाच्या निवडीवर तुमच्या सह्या आहेत. राष्ट्रवादी चिन्ह वापरण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे. त्यामुळे लवकरच परिवर्तन होईल असंही शरद पवारांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…गावभर होर्डिंग्ज लावणं भोवलं, पुनीत बालन यांना पालिकेचा दणका,सन्मानार्थ मंडळाचे कार्यकर्ते एकवटले
हेही वाचा…शिंदे सरकारला हायकोर्टाचा मोठा दणका, आघाडी सरकारचा कोर्टात ‘तो’ मोठा विजय
हेही वाचा…“पुण्यात माजी नगरसेविकेवर बलात्कार, दोषी नराधमांवर कठोर कारवाई करा,” राष्ट्रवादीची मागणी
हेही वाचा…“आधी महत्वाची खाती काढली अन् आता पुण्याचं पालकमंत्री, चंद्रकांत दादांचं डीमोशन बघवत नाही हो ,”
हेही वाचा…“भाजप मित्र म्हणून जवळ घेतो आणि अफजल खानासारखी मिठी मारतो”, मित्र पक्षाचा गंभीर आरोप