नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना कोरोना काळात तीनशे रुपये प्रतिदिन असा कोव्हिड भत्ता देण्यात यावा यांसह अन्य मागण्याचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेनेच्या वतीने आयुक्तांना काही दिवासांपुर्वी देण्यात आले होते. त्यावर आयुक्तांना १४ दिवसांचा अल्टिमेट दिला होता. मात्र, महापालिकेकडून काही तांत्रिक अडचणीमुळे भत्ता देवू न शकले असून आणखी ७ दिवसांची मुदतवाढ मागण्यात आली आहे. तसे लेखी पत्र प्रशासक उपायुक्त चाबुकस्वार यांनी आज अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे यांना दिले आहे.
हे पण वाचा : मन सुन्न करणारी घटना! एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, आख्खं गाव स्मशानात बदललं, ४० मृतदेह एका रांगेत
नवी मुंबई महापालिकेत बहुसंख्य कामगार हे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सदस्य आहेत. यामध्ये सुमारे ११००० च्यावर कामगार काम करतात. २३ मार्च ते ३१ मे २०२० या कोरोना काळात कंत्राटी कामगारांना कोव्हिड भत्ता मिळावा, मयत कामगारांचा विमा व घंटागाडी कामगारांचा १६ महिन्यांचा मिळावा यासाठी ८ फेब्रुवारी २०२१ रोजी नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे संघटनेते मागणी केली असता आयुक्तांनी १४ दिवसांची मुदत दिली होती. नवी मुंबई महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना कोरोना काळात तीनशे रुपये प्रतिदिन असा कोव्हिड भत्ता देण्याचा निर्णय आयुक्त साहेबांनी २७ एप्रिल रोजी घेतला होता. परंतू, त्यावर अद्याप कोणतीही प्रक्रिया झाली नसल्याने अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे यांनी आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर, त्याची अंमलबजावणी पुढील ७ दिवसांत करू, असे आश्वासनाचे लेखी पत्र आयुक्तांनी अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे यांना दिले आहे.
काय आहेत मागण्या!
१. कामगारांना २३ मार्च २०२० ते ३१ मे २०२० या कालावधी मधील कोरोना भत्ता प्रति दिन ३०० रुपये मंजूर भत्ता त्वरित देण्यात यावा.
२. कोरोना ग्रस्त बाधित झाल्यामुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटूंबियांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज इन्शुरन्स स्कीम फॉर हेल्थ वर्कर्स या केंद्र सरकारच्या पॅकेज अतर्गत रुपये ५० लाख अधिक नवी मुंबई महापालिकेच्या कामगार कल्याण निधितून २५ लाख असे एकून ७५ लाख त्वरित देण्यात यावे.
३. घंटागाडी कामगारांचा तिसऱ्या टप्प्यातील १६ महिन्यांचा पगारातील थकीत फरक लवकरात लवकर देण्यात यावा, अशा विविध प्रकारच्या मागण्यात आहेत.
घंटा गाडी कामगारांना पुढच्या तीन चार दिवसात भत्ता मिळेल. इतर कामगारांचा भत्ता देण्यासाठी सुमारे २२ कोटी रुपयांच्या आसपास बजेट लागणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया दोन टप्प्यात राबवू लेखी असे आश्वासन देण्यात आले आहे. घंटा गाडी कामगारांच्या भत्त्यासाठी ७ दिवसांचा अवधि मागीतला आहे. ७ दिवसांत मिळाला नाही तर आम्ही आंदोलन करू.
– आप्पासाहेब कोठुळे
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेना
Read Also :
- जनता पुरात, पालकमंत्री रात्रीत मुंबईत, “हे पालकमंत्री नव्हे, हे तर पळपुटे मंत्री”
- महाराष्ट्रात पावसाचा कहर, पूरग्रस्त भागातील रुग्णांसाठी आरोग्य मंत्र्यांनी केली मोठी घोषणा
- राज्यात पावसाचे थैमान, आता पर्यंत १३६ बळी, ६ जिल्ह्यांत रेड अलर्ट
- दरड कोसळण्याचा धोका असणाऱ्या गावांसाठी कायमस्वरुपी धोरण करणार – एकनाथ शिंदे
- महाराष्ट्रात पावसाचे थैमान, सुप्रिया सुळे अमित शाहांच्या भेटीला