पुणे : पुणे महापालिकेच्या कारभारावरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. पुणे महापालिकेच्या विविध प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (२९ जून) मंत्रालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीला पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांना निमंत्रण दिलं असलं तरी महापौर मुरलीधर मोहोळ यांना निमंत्रण दिलेलं नाही.
गेल्या चार वर्षांत झालेली पुणे शहरात झालेली विकासाची कामे आणि सुरु असलेल्या मोठ्या प्रकल्पाची माहिती समस्त पुणेकरांना आहे.
मात्र आपल्याला डावलून का होईना पण शहराच्या प्रश्नांसंदर्भात बैठक होतेय, याचं स्वागतच !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 29, 2021
दरम्यान, यावर आता मोहोळ यांनी, ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली असून, “गेल्या चार वर्षांत झालेली पुणे शहरात झालेली विकासाची कामे आणि सुरु असलेल्या मोठ्या प्रकल्पाची माहिती समस्त पुणेकरांना आहे. मात्र आपल्याला डावलून का होईना पण शहराच्या प्रश्नांसंदर्भात बैठक होतेय, याचं स्वागतच !” उलट मी कोरोनाबाधित असल्याचा काळ वगळता जवळपास सर्वच बैठकांना उपस्थित राहून आणि समन्वय ठेऊन पुढे जात राहिलो. मात्र या महत्त्वाच्या बैठकीलाच आपल्याला जाणीवपूर्वक सहभागी करुन न घेणे, हे पुणेकर चांगलंच लक्षात ठेवतील. कारण पुणेकर सुज्ञ आणि स्वाभिमानी आहेत,” असा पुणेकरी टोमणा त्यांनी अजित पवारांना टीकेतून लगावला आहे.
महापौर म्हणून मंत्रालयात पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण आपल्याला नाही, हे व्यक्तिशः मलाच नाही, तर पुणेकरांना डावलल्यासारखं आहे. कोरोना संकटाशी सामना करताना शहराचं हित लक्षात घेऊन आणि राज्य सरकारची भरीव मदत महापालिकेला नसतानाही आपण कधीही राजकारण केलं नाही.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 29, 2021
तसेच, “महापौर म्हणून मंत्रालयात पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण आपल्याला नाही, हे व्यक्तिशः मलाच नाही, तर पुणेकरांना डावलल्यासारखं आहे. कोरोना संकटाशी सामना करताना शहराचं हित लक्षात घेऊन आणि राज्य सरकारची भरीव मदत महापालिकेला नसतानाही आपण कधीही राजकारण केलं नाही,” असं म्हणत त्यांनी सरकारकडून महामारी काळात पुण्याला हवी तेवढी मदत न मिळाल्याचंच सांगितलं आहे.
पुणे महापालिकेत अजित पवारांचा मनमानी कारभार; महापौर मोहोळांचा बैठकीतून पत्ता कट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, आज मंत्रालयात बोलावलेल्या या बैठकीला, राज्याच्या मंत्रिमंडळातील आठ मंत्री, वेगवेगळ्या पाच खात्यांचे सचिव आणि पुणे महापालिकेचे आयुक्त उपस्थित होते. तसंच पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्यासह शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदारही या बैठकीला उपस्थित होते. मात्र, महापौरांनाच आमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे पुढील वर्षी असणाऱ्या पुणे महापालिकेच्या निवडणूकच्या पार्श्वभूमीवर, आत्तापासूनच स्थानिक पातळीवर देखील, भाजप विरुद्ध महाविकास आघाडी हा संघर्ष चांगलाच पेटला आहे, हे यातून दिसून येत आहे.
Read Also :
- शासनाने जाहीर केलेल्या महामारी नियमांचा मान राखत, राष्ट्रवादीने थांबवला परिवार संवाद दौरा
- “अनिल देशमुखांना होणार अटक? ईडीला मिळाले सर्व पुरावे” याचिकाकर्त्या वकिलाने केला दावा
- आंदोलकांनी जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या गाड्यांचा ताफा अडवला
- “सुप्रियाताई, आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत!” पुणे महापौरांनी घेतली आक्रमक भूमिका
- “अजित पवारांचा विरोधात पुरावे द्या खरं असेल तर मी स्वतः तक्रार करेन”