पुणे : पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांना एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ पुण्यात पीएफआय संघटनेच्या समर्थकांनी आंदोलन केले. यावेळी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर अशी घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“मला वाटलं तर आदित्यच लग्न मुलीशी जमलं म्हणून जल्लोष करत असतील”; नितेश राणे
PFI संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांना NIA, ED या केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणाऱ्या 60 ते 70 जणांवर पुणे पोलिसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय 26, शिवनेरी नगर कोंढवा खुर्द) याच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी 141 143 145 147 149 188 341 सह मपोका 37/1/3 सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“शीतल ताई डोळ्याच्या दवाखान्यात जाऊन गुडघा तपासून घ्या”; सुळेंच्या त्या फोटोवरून राष्ट्रवादी आक्रमक
आज राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. हिंदुत्वाच्या विचारांचं सरकार असल्याने आणि हिंदुत्ववादी गृहमंत्री असल्याने पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही बारकाईने या गोष्टीवर लक्ष ठेऊन आहोत. मात्र यापुढे कोणीही आमच्या महाराष्ट्रामध्ये पाकिस्तानचे झिंदाबादचे नारे कुणी लावले तर ते सुखरूपपणे घरी जाणार नाहीत. याची काळजी आम्ही घेऊ, असे नितेश राणे यांनी सांगितलं आहे. तसेच आज आमचं सरकार आहे, गरज भासली तर रस्त्यावर उतरू गरज भासली तर घरात घुसू असा इशारा दिला आहे.
“बीकेसीवर दसरा मेळावा अन् शिवाजीपार्कवर हसरा मेळावा”
या संघटना विविध पद्धतीने आपला देश आणि राज्य आपल्या ताब्यात कसा येईल. यासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी इस्लामचं नाव घेतात. मुस्लिम तरूणांना वापरतात. त्यांना आधार कार्ड काढून देतात. धर्मांतराचे विषय वापरतात. ड्रग्स आणि इतर गोष्टीचा वापर करतात. आपल्या देशामध्ये असलेला हिंदू समाज त्याचं नुकसान कसं करता येईल आणि त्यांचं राज्य कसं प्रस्थापित करता येईल. यासाठी पीएफआय नावाची संघटना सातत्याने काम करते. असा आरोप देखील नितेश राणे यांनी केला आहे.
Read also
- “महाराष्ट्रात कुणी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या तर त्यांना सोडणार नाही”; देवेंद्र फडणवीस
- PFI च्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर पुण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा
- “गद्दारांना क्षमा नाही, तात्काळ माफी माग, नाहीतर..;” रूपाली पाटलांचा म्हात्रेंना सज्जड दम
- “महाराष्ट्रावर संकट..! अन् शिंदे सरकार दिल्ली वारी एन्जॉय करताहेत”
- “अमित शहा, फडणवीसांना पुढेपण भेटणार”; भाजप प्रवेशाबाबत खडसेंचं स्पष्टीकरण