सोलापूर : देशात एव्हाना राज्यात प्रचंड महागाई वाढली आहे. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राज्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसतर्फे जोरदार आंदोलने करण्यात येत आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. याचाच धागा पकडून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हांडाचं एक ट्विट; अन् चार जणांवर कारवाईचा बडगा
देशात महागाई वाढतेय त्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही, हे लोक फक्त भोंगा आणि हनुमान चालिसेबद्दल बोलतात. देशातले महागाई सारखे मुद्दे लपवायचे आहेत. त्यामुळे यांना भोंगे. हनुमान आणि रामचंद्र, शिवशंकर आठवतात, असा टोला धनंजय मुंडे यांनी भाजप आणि मनसेला लगावला आहे.
“एका बाजुला मनसे आणि दुसऱ्या बाजुला माफिया सेना”; अयोध्या दौऱ्याबाबत सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया
विरोधक महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो की महाविकास आघाडीमध्ये दहापट हुशार लोक आहेत. यांनी दहा जन्म घेतले तरी महाविकास आघाडीचं काही वाईट करू शकत नाही, असा हल्लाबोल देखील त्यांनी केला. उसतोड कामगार महामंडळ मी माझ्याकडे घेतलं. माझ्या वडिलांनी 2 ते 4 वर्ष का होईना उस तोडलाय. मुंडे साहेबाचं स्वप्न महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना पुर्ण करता आलं. कारण फक्त महामंडळ काढलं नाही, तर त्यांचं कार्यालय पुण्यात तयार केलं. असंही ते म्हणाले.
“फडणवीस साहेब लोकांचा गैरफायदा किती घेणार, देशाचे तुकडे करण्याचा मानस आहे का?”
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून राज्यात एव्हाना देशात महागाईचा ड्राग्नन जिवंत झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे सध्या हाल होत आहेत. यावरून राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसकडून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देत आंदोलने सुरू आहेत.
Read also:
- “हा जमलेला महासागर सांगतो की शेतकऱ्यांना या मुर्दाड सरकारविरोधात चीड”
- नवाब मलिक प्रकरणांवरून फडणीस संतापले; म्हणाले.. की, जेवढा अट्टाहास मलिकांना वाचवण्यासाठी…;
- अजून किती काळ नवाब मलिकांची पाठराखण करणार? राजीनामा घ्या; चंद्रकांत पाटील
- “पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना?” नवाब मलिक प्रकरणांवरून निलेश राणेंचा तिखट सवाल
- नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात; दाऊदच्या लोकांसोबत व्यवहार केल्याचा न्यायालयाचं निरीक्षण