मुंबई : भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावासमोर ‘होमोसेक्शुअल’ असे लिहिलेला एक स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मतदारसंघाच्या नावाऐवजी तेथे हा शब्द वापरण्यात आला आहे. याबाबत पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विटरवर याबाबतचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे.
भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे जी यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. @BJP4India आपण दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा @MahaCyber1 पुढील कारवाई करेल.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 27, 2021
स्वाती चतुर्वेदींच्या या ट्विटची दखल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी घेत कारवाईचा इशारा दिला आहे. भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसेजी यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही, असे अनिल देशमुख म्हणाले.
भाजपने दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल, असा इशाराच अनिल देशमुखांनी दिला आहे.
खरचं वेबसाईटवर रक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख ?
भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसेंच्या नावापुढील वादग्रस्त उल्लेख हा गुगल ट्रांसलेशनचा घोळ असल्याचे दिसून येत आहे. Raver या इंग्रजी शब्दाचे गुगल ट्रान्स्लेटमध्ये जाऊन हिंदी भाषांतर केले असता होमोसेक्सुअल असा अर्थ सांगितला जात आहे.
Read Also :
- पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला लवकरच मिळणार मान्यता, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे आश्वासन
- ‘…तेव्हा आशिष शेलार तुम्ही झोपले होते का ?’ पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीचे पुराव्याने उत्तर
- अमित शहांचा राजीनामा घ्या, दिल्लीतील हिंसाचारानंतर काँग्रेसची मागणी
- ‘बेळगाव सोडा, मुंबईवर सुद्धा आमचाच हक्क’, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्याचे अजब वक्तव्य
- ‘देवेंद्रभाऊ, ज्या मेट्रोतून तुम्ही प्रवास केला त्याची सुरुवात काँग्रेसने केली’, सत्यजित तांबेंचा फडणवीसांना टोला